भारतीय नौदलात सीनियर सेलरपदी श्रेयश राणेची निवड
रोहा, ता. ३१ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील धाटाव गावचा रहिवासी श्रेयश उदय राणे याची भारतीय नौदलाच्या सीनियर सेलरपदी निवड झाली आहे. अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातून येत प्रामाणिकपणा, कष्ट व जिद्दीच्या जोरावर श्रेयशने हे यश संपादन केले आहे. निवडीची बातमी समजताच मित्र-परिवाराने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
श्रेयशने रोह्यातील जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. देशसेवेची आवड मनात ठासून भरल्याने त्याने पुढील शिक्षण मिरज येथील रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमीमध्ये पूर्ण केले. येथे त्याला अनुभवी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुंबईतील विविध टप्प्यांच्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरून त्याने नौदलात प्रवेश निश्चित केला.
चौकट
चार महिन्यांचे प्रशिक्षण ठरणार निर्णायक
पुढील काही दिवसांत श्रेयश ओरिसा राज्यात चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणासाठी जाणार असून त्यानंतर त्याला प्रत्यक्ष पोस्टिंग मिळणार आहे. मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
फोटो कॅप्शन : भारतीय नौदलात सीनियर सेलरपदी श्रेयश राणेची निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना राणे कुटुंब.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.