दांडेकर महाविद्यालयात ‘उडान महोत्सवा’चे आयोजन
पालघर, ता. ३१ (बातमीदार) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभाग आणि सोनोपंत दांडेकर कला महाविद्यालयाच्या वतीने ‘उडान : द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन २०२६’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बळीराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. बळीराम गायकवाड म्हणाले, की अभ्यासक्रमापलीकडे जाऊन आपण जीवनाचा अर्थ शोधला पाहिजे. जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपण बाहेर पडतो तेव्हा बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात, पण एक गोष्ट आपण विसरत नाही, ती म्हणजे अनुभव आणि हा अनुभव देण्याचे काम आजीवन शिक्षण व विस्तार विभाग करीत आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले. दरम्यान, सोनोपंत दांडेकल कला यांच्यासह आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय यांच्याही पुढाकाराने हा महोत्सव पार पडला. या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष मंगेश पंडित यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आजीवन शिक्षण जे आयुष्यभर चालू असते, जे समाजाशी नाळ जोडते. केवळ परीक्षेतील गुण आपण आयुष्यात काय बनणार आहेत हे ठरवू शकत नाहीत. आपली स्वप्नं आपणच जपली पाहिजेत. त्यासाठी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. या महोत्सवात पथनाट्य, भित्तीपत्रक निर्मिती, पोवाडा, सर्जनशील लेखन व वक्तृत्व या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २२ महाविद्यालये व ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. या महोत्सवात वक्तृत्व व भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम, तर पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदकाचे मानकरी ठरले. याप्रसंगी डॉ. कुणाल जाधव, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ, डॉ. महेश देशमुख तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत मोगले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.