मुंबई

रिक्षाचालकावर लोखंडी पान्ह्याने हल्ला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : अपघातात रिक्षा उलटल्यानंतर नुकसानभरपाईच्या वादातून रिक्षाचालकावर लोखंडी पान्ह्याने हल्ला केल्याची घटना ठाण्यातील गांधीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी फरार दुचाकीस्वाराविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार राजेश छत्रे (वय ४६) हे मानपाडा येथील धर्मवीरनगर परिसरात राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, २८ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता ते गांधीनगर येथून रिक्षा घेऊन घरी जात होते. पोखरण रोडवरून गांधीनगरच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी त्यांनी अचानक ब्रेक दाबला. यामुळे त्यांची रिक्षा उलटल्याने मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दुचाकीस्वाराकडे भरपाईची मागणी केली. मात्र, दुचाकीस्वाराने मोबाईलमध्ये त्यांचे चित्रीकरण करत ‘तू पुढे चल, मी तुला पैसे देतो’ असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक वसंत विहारच्या दिशेने जात असताना, गांधीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीस्वाराने अचानक त्यांचा पाठलाग करून जवळील लोखंडी पान्हा काढला. शिवीगाळ करत ‘तुला पैसे पाहिजेत का?’ असे म्हणत त्याने डोक्यावर वार केला. या हल्ल्यात छत्रे यांना दुखापत झाली आहे. दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला असून याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार दुचाकीस्वाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

‘क्रांतिज्योती विद्यालय...’च्या यशानंतर ‘मराठी शाळा योजना’ची सुरुवात

SCROLL FOR NEXT