मुंबई

तरुणीचा रेल्वे अपघातात बळी;

CD

रेल्वे अपघातात तरुणीचा मृत्यू
लोकल पकडताना तोल गेल्याने खाली पडली
बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) ः धावती रेल्वे लोकल पकडताना तोल जाऊन खाली पडल्याने चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय २८) हिचा मृत्यू झाला. फलाट क्रमांक तीनवरून बदलापूरहून मुंबईसाठी सुटणारी सकाळी ८.१०ची लोकल पकडण्यासाठी चेतना आली होती. लोकल सुटल्याने चालू लोकल पकडण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेल्याने हा अपघात झाला.
बदलापूर फलाट क्रमांक तीनवर सीएसएमटीच्या बाजूने फलाट लगेच संपतो आणि त्या धावपळीत चेतना थेट रेल्वे रुळावर कोसळली. लोकलचा जोरदार धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सकाळच्या घाईत आणि उशीर झाल्याच्या तणावात घेतलेला हा निर्णय तिच्या जीवावर बेतला. चेतना देवरुखकर ही बदलापूर पूर्वेतील ज्युवेली गावातील जगन्नाथ गॅलेक्सी या सोसायटीत वास्तव्यास होती. वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. ठाण्यातील एका प्रतिष्ठित खासगी कंपनीत ती नोकरीला होती. ती रोज बदलापूर ते ठाणे असा लोकलने प्रवास करीत होती. हा प्रवास आज तिच्यासाठी अखेरचा ठरला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपुऱ्या रेल्वे फेऱ्या
बदलापूर स्थानकातून अपुऱ्या रेल्वे फेऱ्या, वाढती प्रवासी गर्दी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वाढते शहरीकरण आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता, लाखो प्रवासी रोज बदलापूर ते मुंबई व उपनगरांत प्रवास करतात. मात्र त्या तुलनेत रेल्वे फेऱ्या अत्यंत अपुऱ्या आहेत. तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे कामही रखडलेले आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटना, स्थानिक प्रशासन व स्थानिक नेत्यांनी अनेकदा आंदोलने व पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल, पियूष गोयल यांचं विधान; तटकरे म्हणाले असं काही झालंच नाही

Latest Marathi News Union Budget 2026 Live :अपघात विम्यावर कोणताही टॅक्स नाही ! निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त अन् काय महाग? वाचा संपूर्ण यादी...

Union Budget 2026 : अर्थमंत्र्यांनी चंदन, नारळ, काजू, शेंगदाणे आणि बदाम याबद्दल काय म्हटले?

Praful Patel NCP president : राष्ट्रवादी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती; पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT