मुंबई

कृषी केंद्राला विद्यार्थ्यांची भेट

CD

कृषी केंद्राला विद्यार्थ्यांची भेट
वानगाव, ता. १ (बातमीदार) : ग्रामीण विकास, शेती विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळावे, या उद्देशाने सेंट जोसेफ विद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे डहाणू येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रास शैक्षणिक अभ्यास सहल काढण्यात आली होती. प्रा. डॉ. महेंद्र जीवन कडू, प्रा. सोनल सावर नेतृत्वाखाली ही सहल पार पडली.
आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पीक व्यवस्थापन तसेच शेतीपूरक व्यवसाय याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. जाधव यांनी सांगितले की कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन युवकांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मशरूम उत्पादन, चिकू प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय खत निर्मिती यांसारखे व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराची वाटचाल केली आहे. विशेषतः महिला बचत गटांना दिलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक महिलांनी चिकू प्रक्रिया, मशरूम प्रक्रिया, सेंद्रिय शेती, मधुमक्षिका पालन व फलोद्यान यांसारखे व्यवसाय यशस्वीपणे उभारले असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात लक्षणीय वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

काय करते ओक कुटुंबाची होणारी मोठी सून? सिनेसृष्टीपासून आहे कोसो दूर; प्रसाद - मंजिरीने शेअर व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: चंद्रपूर वडेट्टीवार गटाचे २० नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात

Gold Loan : बँकेत जर 10 ग्रॅम सोनं गहाण ठेवल तर किती कर्ज मिळतं? किती पैसे वापरायला मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याचा कायापालट! ४.४३ कोटींच्या निधीतून उभारणार भव्य नवीन इमारत

SCROLL FOR NEXT