शवविच्छेदनासाठी फरपट
वसई-विरार पालिकेचे केंद्र नसल्याने अडचणी
विरार, ता. १ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेला शवविच्छेदनासाठी जिल्हा परिषदेच्या केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील रुग्णालयांना पत्र पाठवून पालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षणाची मागणी केली आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने फरपट सुरू आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. शहरात अपघाती मृत्यू, आत्महत्या, अकस्मात मृत्यूच्या घटना घडत असतात. अशा वेळी मृतदेहाचे शवविच्छेदन होणे गरजेचे असते, पण वसई-विरार पालिका स्थापन झाल्यापासून पालिकेने स्वतःचे शवविच्छेदन केंद्र तयार केलेले नाही. त्यामुळे आजही जिल्हा परिषदेच्या केंद्रांमार्फतच मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेचे विरार ग्रामीण रुग्णालय तसेच कामण, नवघर, सोपारा, आगाशी, भाताणे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची प्रक्रिया होते, पण ही व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना मुंबईसह इतर ठिकाणी जावे लागते. तसेच शहरातील शवविच्छेदन केंद्रांमध्ये मनुष्यबळही अपुरे आहे.
========================================
शवविच्छेदन केंद्र सुरू व्हावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशिक्षणासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाशी संपर्क केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर डॉक्टर प्रशिक्षणासाठी पाठवले जातील.
- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.