मतदानासाठी जनजागृती
प्रशासनाकडून ठिकठिकाणी फलक
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त व निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी महत्त्वाच्या व विविध ठिकाणी प्रशासनाकडून मतदान जनजागृती करणारे फलक लावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील ५९ जिल्हा परिषद व ११८ पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुमारे चार वर्षांनी रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात एकूण १७ लाख ३८१ मतदार आहेत. यामध्ये आठ लाख ५७ हजार नऊ महिला आणि आठ लाख ४६ हजार ३४७ पुरुष आणि २५ तृतीयपंथी मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या मोठी असून, त्यांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील दोन हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त व निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी महत्वाच्या व विविध ठिकाणी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकारी, कर्मचारी, पोलिस प्रशासनही सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार लावा.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.