मुंबई

दारिद्र्य डोक्यात असण्यापेक्षा ते खिश्यात नसावे-

CD

प्रबळ जिद्द असेल तर यशाची खात्री ः हितेंद्र ठाकूर
सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाचा हीरक महोत्सव साजरा
विरार, ता. १ (बातमीदार)ः समाज महामंडळ स्थापन करणे सोपे आहे. मात्र, ती टिकवणे, वाढवणे सोपे नाही. समाज मंदिर आणि वसई विकास बँक महामंडळाची यशोगाथा त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे मत वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले. या वेळी दारिद्र्य डोक्यात असते, ते कधी खिशात नसते. त्यामुळे मनात प्रबळ जिद्द असेल, तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात रविवारी (ता. १) हिरकमहोत्सवी सांगता समारंभ झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी आमदार हिंतेंद्र ठाकूर यांनी भूषविले. या वेळी वसईतील खुतोडी, मांडलई, मुळगाव, किरवली, उमेळे गावांनी मिळून स्थापन केलेल्या सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाने ६० वर्षे पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष नरेंद्र राऊत यांनी महामंडळाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला, तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जगदीश राऊत यांनी महामंडळाच्या स्थापनेपासूनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भविष्यातील योजनांचा आढावा घेताना डे केअर, हॉस्पिटल, शाळा, क्रीडा संकुल, अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.
--------------------------
मान्यवरांची हजेरी
मान्यवरांनी हिरकमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महामंडळ स्थापनेमध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठांबरोबर दिवंगत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार मनीषा चौधरी, आमदार राजन नाईक, सोमवंशी क्षत्रिय समाजयोन्नती संघाचे अध्यक्ष नरेश राऊत, वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत, समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे, माजी महापौर प्रवीण शेट्टी, महामंडळाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर घरत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
------------------------------
चित्ररथ मुख्य आकर्षण
सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाने शनिवारी संध्याकाळी शोभायात्रा काढली होती. खुंतोडी, किरवली, मुळगाव, उमेळे, मांडलई शाखांनी ढोलपथक, लेझीम पथक, भजन मंडळे सहभागी झाली होती, तर परंपरा दर्शविणारे भातशेती, वाडवळ समाजाची पारंपरिक लग्नपद्धती, मामांकडून येणारे काकण, विवाहाची वरात, केळीच्या बागा, समाजातील अभिमानस्पद व्यक्तिरेखा, वालाची शेतीची चित्ररथ मुख्य आकर्षण होते. या वेळी लेझीम, फुगडी, डोलाच्या तालावर महिलावर्गाने धरलेला ठेका बघण्यासारखा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT