प्रीमियर ४
‘बॉर्डर २’चे विशेष प्रदर्शन!
देशभक्तीची भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम साधत जीएम मॉड्युलरने मुंबईत ‘बॉर्डर २’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात चारशेहून अधिक सीआयएसएफ जवान, वास्तुविशारद आणि डीलर्स सहभागी झाले होते. भारताच्या सुरक्षा दलांच्या शौर्य, शिस्त आणि सेवेला मानवंदना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून सांस्कृतिक अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न या विशेष प्रदर्शनातून करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेता अहान शेट्टी आणि अभिनेत्री अन्या सिंग यांनी उपस्थिती लावली. या प्रदर्शनाबद्दल बोलताना जीएम मॉड्युलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत जैन म्हणाले, “देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सीआयएसएफ जवानांचा सन्मान करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. तसेच भारताच्या पायाभूत विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वास्तुविशारद आणि डीलर्ससोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याचाही हा एक मार्ग आहे.”
......
‘तेरे नाम’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
सलमान खानचा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तेरे नाम’ हा त्या काळी खूप गाजलेला चित्रपट होता. सलमानने या चित्रपटात राधे ही भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत भूमिका चावला होती. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर इतका गडद ठसा उमटवला की, २५ कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला होता. आता व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने हा ‘तेरे नाम’ चित्रपट जवळपास २३ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. २७ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना राधेची प्रेमकथा पुन्हा एकदा थेट मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. यासोबतच आणखी दोन गाजलेले चित्रपट ‘देवदास’ आणि ‘युवा’देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.