मुंबई

ठाणे स्टेशन परिसरात रिक्षाचालकावर हल्ला

CD

ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकावर हल्ला
महिला रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे, ता. १ (बातमीदार) : ठाणे स्थानकजवळील गावदेवी मैदान परिसरात प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादातून एका पुरुष रिक्षाचालकावर एका महिला रिक्षाचालकाने फरशीचा तुकडा व काठीने हल्ला केल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. या घटनेत रिक्षाचालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगर परिसरात राहणारे लहू टकळगे (वय ४२) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते ठाणे स्थानक परिसरात भाड्याने घेतलेली रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी (ता. २८) सायंकाळी ते रिक्षा घेऊन गावदेवी मैदानाजवळील प्रणव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्यावर वर्तकनगरकडे जाणारे प्रवासी भरण्यासाठी उभे होते. त्या वेळी रिक्षा चालवणाऱ्या एक रिक्षाचालक महिला या अचानक टकळगे यांच्या रिक्षासमोर आल्या. ‘येथे गाडी कशाला लावलीस, गाडी बाहेर काढ,’ असे म्हणत त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. टकळगे यांनी आपला नंबर असल्याचे सांगून प्रवासी भरण्याची परवानगी मागितली असता, संबंधित महिलेने ‘पहिले माझ्या भावाची गाडी भरू दे, नंतर तू भर,’ असे म्हणत शिवीगाळ सुरूच ठेवली. वाद वाढत गेल्यानंतर त्या महिलेने टकळगे यांना कानाखाली मारली. प्रत्युत्तरादाखल टकळगे यांनीही तिला एक चापट मारली. रागाच्या भरात त्या महिला रिक्षाचालकाने रस्त्याच्या कडेला असलेले फरशीचे तुकडे टकळगे यांच्या दिशेने भिरकावले, ज्यातील एक तुकडा त्यांच्या डोक्याला लागून तेथे गंभीर जखम झाली. काही जणांनी मध्यस्ती करत टकळगे यांना तातडीने रुग्णालयात नेत उपचार केले. उपचारानंतर टकळगे यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठत महिला रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Latest Marathi News Live Update: मुंबईत कोणतीही मुलं बेपत्ता झालेली नाहीत, पोलिसांची माहिती

Momos Scam: मोमोजची आवड पडली महागात; कुटुंबाने गमावले तब्बल 85 लाखांचे दागिने

T20 World Cup: पाकिस्तानचा बहिष्कार तरी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार; जाणून घ्या त्यामागचं गणित

SCROLL FOR NEXT