मुंबई

पालिकेच्या तावडीतून भुखंडाची सुटका

CD

पालिकेच्या बेकायदा हस्तांतरणाला चाप
नऊ वर्षांच्या लढ्यानंतर २५० कोटींची जमीन चर्च ट्रस्टच्या नावावर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : वर्तकनगर येथील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या मालकीची सुमारे २०,५७० चौरस मीटर क्षेत्रफळाची अंदाजे २५० कोटी रुपये किमतीची जमीन तब्बल नऊ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर अखेर ट्रस्टकडे परत आली आहे. खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेला हा भूखंड खुद्द ठाणे महापालिकेने अवैधरीत्या बळकावून तो विकासकांना आंदण दिल्याचा आरोप ट्रस्टने केला होता. याप्रकणी अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या निर्णायक आदेशामुळे ३० जानेवारीला या भूखंडाचा सातबारा पुन्हा चर्च ट्रस्टच्या नावावर झाला आहे.

वर्तकनगर (माजिवडा) परिसरातील सेक्टर क्रमांक ४ मधील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेली ही जमीन मूळतः येथील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या मालकीची आहे; मात्र नियमांची पूर्तता न करता आणि आवश्यक सर्वेक्षण न करता ही जमीन २०१७मध्ये ठाणे महापालिकेच्या नावावर हस्तांतरित केली होती. हा प्रकार ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी औपचारिक तक्रार दाखल करीत ठाणे सिटीझन्स फाउंडेशनच्या माध्यमातून कायदेशीर लढा सुरू केला. या प्रकरणात अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. सुरुवातीला महापालिकेने संपूर्ण २०,५७० चौ. मी. जमिनीवर दावा केला होता; मात्र नंतर हा दावा कमी करून केवळ १०,१३०.४९ चौ. मी. असल्याचे मान्य केले. यामुळे हस्तांतरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे स्पष्ट झाले.

याहून गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या नावावर गेलेल्या जमिनीतील सुमारे ९०० चौ. मी. जमीन हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी आदित्य बिल्डर्सना बेकायदा विकली. ही जमीन ट्रस्टच्या निवासी क्षेत्रात येत होती आणि ती हस्तांतरित करता येण्याजोगी नव्हती. दरम्यान, ट्रस्टच्या वतीने दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करून विकास हक्काची बेकायदा विक्री झाल्याचेही उघड झाले. अखेर ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने हा विषय मुंबई उच्च न्यायालय, राज्य मावाधिकार आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे सातत्याने मांडल्या. गेल्या नऊ वर्षांपासून हा लढा सुरू होता. अखेर ठाणे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हस्तांतरण रद्द करून जमीन चर्च ट्रस्टकडे परत देण्याचे आदेश दिले आहेत.

ऐतिहासिक विजय
कॅसबेर ऑगस्टीन यांच्या नेतृत्वाखाली ठाणे सिटीझन फाउंडेशनच्या वतीने नऊ वर्षे हा लढा सुरू होता. ३० जानेवारीला ठाणे तहसीलदार, तलाठी आणि माजिवडा येथील मंडळ अधिकाऱ्यांनी जमीन नोंदीची अंतिम फेरफार व नोंदणी पूर्ण केली असून, नवीन सातबारा उतारे नोंद केले आहेत. त्यामध्ये जमीन पुन्हा एकदा सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टचे नाव मालक म्हणून चढवण्यात आले आहे. हा ऐतिहासिक विजय असल्याचे कॅसबेर ऑगस्टीन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT