मुंबई

ठाणे थोडक्यात बातम्या

CD

ठाणे थोडक्यात बातम्या

पार्क केलेल्या मिनी बसला आग

ठाणे : दिवा येथील शीळगाव परिसरात भवानी मंदिराजवळ मोकळ्या जागेत पार्क केलेल्या एका मिनी बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी (ता.०१) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यावर काही तासात ती आग नियंत्रणात आली. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
.........

मांजात अडकलेल्या कबूतराची सुटका

ठाणे : येथील चरई, जुना मुंबई-पुणे रोड या ठिकाणी उंचावर असलेल्या वीजेच्या तारांमध्ये मांजामध्ये अडकलेल्या कबुतराची सुटका करण्यात ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. हा प्रकार रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हेमंत शहा नामक व्यक्तीने माहिती दिल्यावर समोर आला. त्यानंतर, त्या कबुतराची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. असे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.
.......

कळव्यात ७५ हजारांची रोकड लांबवली

ठाणे : कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या कळवा सहकार बाजारचे शटर उचकटून अनोळखी चोरट्यांनी ७४ हजार ३५० रुपयांची रोकड लांबवली आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ३१) समोर आला. याप्रकरणी कळवा, पारसिकनगर येथील रहिवासी व असिस्टंट मॅनेजर संजय पंदेरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कळवा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.......

सिक्युरिटी गार्डच्या घरात चोरी

ठाणे : दिवा पूर्व, श्लोक नगर येथील शालिनी अपार्टमेंटमध्ये राहणारे तथा सिक्युरिटी गार्ड असलेले गौतम गुप्ता यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या बंद घराचे लोखंडी कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटाचा लॉकर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला. ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ या कालावधीदरम्यान घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..........

दीड लाखाची दुचाकी चोरीला

ठाणे : डायघर, देसाई नका येथील रिव्हरहुड पार्क येथे पार्क केलेली दीड लाखाची रॉयल इंफिल्ड कंपनीची दुचाकी चोरीला गेली आहे. तक्रारदार मनजीत सिंग (वय ६३) हे शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मार्केटमध्ये जाण्याकरिता दुचाकी घेण्यासाठी गेले असता, ही बाब समोर आली. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
...............

बसमध्ये चढताना मोबाईल चोरी

ठाणे : ठाणे स्थानक येथील सॅटिस ब्रिजवरील बस स्टॉपवर सहा नंबरच्या बसमध्ये चढताना, पाचपाखाडी येथील कोमल गाला (वय २९) यांचा कंपनीने कामासाठी दिलेला मोबाईल फोन चोरीला गेला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २९) संध्याकाळी घडली असून, चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत ७० हजार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT