मुंबई

अंजूर ग्रामस्थांना पाणी, कचरा, क्रीडांगणाच्या समस्या

CD

अंजूर ग्रामस्थांना पाणी, कचरा, क्रीडांगणाच्या समस्या
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अंजूर ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शनिवारी (ता. ३१) अंजूर ग्रामपंचायतीस अचानक भेट दिली. या वेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन तसेच क्रीडांगणाच्या अभावासह विविध नागरी समस्या सीईओंसमोर मांडल्या. या नागरी समस्यांची दखल घेत सीईओंनी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील सातही घटकांचा विचार करून ग्रामपंचायतीत झालेल्या कामांची सविस्तर माहिती सीईओ यादव यांना देण्यात आली. या वेळी गटविकास अधिकारी गोविंद खामकर, ग्रामपंचायत अधिकारी अनिल कांगणे, सरपंच छाया जनाठे, उपसरपंच हरेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

अभियानांतर्गत स्वच्छता, लोकसहभाग, सेवा सुविधा आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी या बाबींमध्ये अंजूर ग्रामपंचायतीने समाधानकारक कामगिरी केल्याचे सीईओ यादव यांनी नमूद केले. ज्या घटकांमध्ये अधिक गुण मिळू शकतात त्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून अभियानाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामपंचायत समिती सदस्यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. मुख्य माणकोली-अंजूर जलवाहिनीवरून टॅपिंग करून एस. एस. अपार्टमेंटमधील १२७ मिळकतधारकांना पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागा व घर खरेदीसाठी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्व्हे क्रमांक २२३ मधील ३० गुंठे जागा ग्रामपंचायतीला तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गावातील एकमेव क्रिकेट मैदान बाधित झाल्याने मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याची बाब ग्रामस्थांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सर्व्हे क्रमांक २२३ मध्ये क्रीडांगण विकसित करण्याची मागणी करण्यात आली.

कचऱ्याचे वर्गीकरण आणि खतनिर्मिती
जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी रणजित यादव यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून खतनिर्मिती व रिसायकलिंग करण्याचे निर्देश दिले. तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी शालेय आजी-माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ग्रामविकासाची चळवळ उभी करण्याचा सल्ला दिला. यानंतर सीईओ यादव यांनी अंजूर ग्रामपंचायतीस मंजूर झालेल्या पंचायत प्रशिक्षण केंद्राची (पीएलसी) पाहणी केली. केंद्राचे सादरीकरण समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Budget 2026 : बजेटमधील घोषणा नेमक्या कधी लागू होतात? नागरिकांना फायदा कधीपासून मिळतो, जाणून घ्या

Nashik Crime : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिसाचा लॉजमध्ये संशयास्पद आढळला मृतदेह? इरफानच्या मृत्यूमागील गूढ कायम, उलटसुलट चर्चांना उधाण

IGNOU 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IGNOU री-रजिस्ट्रेशनची डेडलाइन पुढे ढकलली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Airtel Recharge Plan : एअरटेलच्या कोट्यवधी युजर्सना मोठा धक्का! कंपनीने एका रात्रीत बंद केली तुमची पसंतीची फ्री सर्व्हिस

SCROLL FOR NEXT