क्रेडाई बीएएनएम रायगडला नववा प्रॉपर्टी एक्स्पो
६ ते ९ फेब्रुवारीला कामोठ्यात
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : क्रेडाई बीएएनएम रायगड व रायगड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित ९ वा प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हा दि. ६ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कामोठे, खंडेश्वर रेल्वे स्थानकासमोर आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबई-रायगड परिसरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्स्पो ठरणार असल्याची माहिती आयोजकांनी तुर्भे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू व मेट्रो नेटवर्कमुळे परिसराची कनेक्टिव्हिटी प्रचंड वाढली असून, यंदा एक लाखाहून अधिक नागरिक व गुंतवणूकदार एक्स्पोला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची विशेष उपस्थिती हे या एक्स्पोचे आकर्षण ठरणार आहे.
चौकट
७० विकासक, ३०० प्रकल्प; स्पॉट बुकिंगला कारसह आकर्षक बक्षिसे
क्रेडाई बीएएनएम रायगडचे अध्यक्ष जीतू जगवानी यांनी सांगितले की, हा एक्स्पो केवळ मालमत्ता विक्रीपुरता मर्यादित नसून पायाभूत सुविधा, जीवनशैली व गुंतवणुकीची संधी दाखवणारा मंच आहे. संयोजक हर्निश करिया यांनी ७० हून अधिक विकासक व ३०० पेक्षा जास्त प्रकल्प उपलब्ध असल्याचे सांगितले. एक्स्पोदरम्यान स्पॉट बुकिंगसाठी कार, आयफोन व एलईडी टीव्हीसारखी आकर्षक बक्षिसे तसेच विशेष सवलती देण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.