मुंबई

घाटकोपर पूर्वेतील लक्ष्मण नगर प्रशासनाकडून दुर्लक्षित

CD

घाटकोपर पूर्वेतील लक्ष्मण नगर प्रशासनाकडून दुर्लक्षित
आठ वर्षांपासून रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : घाटकोपर पूर्वेतील राजावाडी परिसरातील लक्ष्मण नगर येथील रहिवासी गेल्या तब्बल आठ वर्षांपासून विविध नागरी समस्यांना सामोरे जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी माजी आमदार व माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे.
लक्ष्मण नगर परिसरात हजारो नागरिक वास्तव्यास असून, झाडांच्या वाढलेल्या फांद्या थेट घरांमध्ये शिरत आहेत. तसेच गटारांची नियमित स्वच्छता न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याची तक्रार करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, कचरा संकलनही वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. “ही समस्या एखाद-दोन दिवसांची नसून गेली आठ वर्षे आम्ही याच परिस्थितीत जगत आहोत,” अशी प्रतिक्रिया रहिवासी रिटू चंदेरीया यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांसह केली पाहणी
लक्ष्मण नगरमधील गंभीर समस्यांची दखल घेत माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी रहिवाशांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. पाहणीनंतर सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता : जितेंद्र आव्हाड

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

Pune Drama Festival: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'सकाळ एकांकिका महोत्सव', कसं करायचं बुकिंग ?

SCROLL FOR NEXT