File Photo
File Photo 
मुंबई

रेल्वेने प्रवास करणार असाल, तर हे वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता.12) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ठाणे स्थानकातील जुना पादचारी पूल काढण्यासाठी शनिवारी (ता.11) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे : 
कुठे : माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर 
कधी : स. 11.20 ते दु. 3.50 वाजेपर्यंत 
परिणाम : माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मेल/एक्‍स्प्रेस आणि लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे : 
कुठे :
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर 
कधी : सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक.
परिणाम : बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गांवरील लोकल सेवा बंद असणार. तसेच पनवेल-अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-पनवेल-ठाणे या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी-वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे-नेरूळ दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकात रात्रकालीन ब्लॉक 
मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकातील जुना पादचारी पूल काढण्यासाठी शनिवारी (ता.11) रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते कळवा स्थानकांदरम्यान मध्यरात्री 12 ते पहाटे 5.15 वाजेपर्यंत ब्लॉकची कामे केली जाणार आहेत. परिणामी शनिवारी रात्री 11.10 नंतर सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT