आदित्य ठाकरेंच्या 'या' प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष 
मुंबई

आदित्य ठाकरेंच्या ...'या' प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने ३ हजार ८०० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने नीती आयोगाला २८ जून २०१९ ला पत्र पाठवण्यात आले होते; मात्र अद्यापही नीती आयोगाकडून हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करत असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्यातील नागरी भागात निर्माण होणारे ३७२ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट जलस्रोतात सोडले जात असल्याचा ठपका राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात ठेवण्यात आला. त्यापूर्वी केंद्र सरकारने केलेल्या पाहणीत राज्यातील २२ प्रमुख नद्यांमधील ५३ पट्टे प्रदूषित आहे. त्यांच्या शुद्धीकरणाबरोबर भविष्यात नद्या प्रदूषित न होण्यासाठी प्रकल्प आखण्यात आले आहे. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी ‘राज्य नदी संवर्धन योजने’अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३ हजार ८०० कोटी रुपयांचे २१ प्रस्ताव सादर झाले होते. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने २८ जून २०१९ रोजी नीती आयोगाला पत्र पाठवण्यात आले. हा निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी सुधार योजना तयार केली आहे. राज्यातील सर्व नद्यांच्या शुद्धीकरणासाठी साधारण ६ हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. त्यातील ३ हजार ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव नीती आयोगाला पाठवण्यात आला आहे.

प्रस्तावित योजना 

  •  औद्योगिक आणि नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया 
  •  नद्यांमध्ये कचरा येणार नाही म्हणून खबरदारी 
  •  नद्यांमध्ये मत्स्यबीज सोडून नैसर्गिक स्वच्छता राखणार
  •  शेतीतील रासायनिक खतमिश्रित पाणी थेट नदीत न येण्यासाठी उपाययोजना
  •  पहिल्या टप्प्यात ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील नद्याचे शुद्धीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT