मुंबई

नव्या पत्री पूलाबाबत महत्वाची अपडेट; आजपासून पुढील पाच दिवसांसाठी वाहतुकीत मोठा बदल

रविंद्र खरात

कल्याण : येथील नव्या पत्रीपूलाचे काम अंतिम टप्यात असून पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी मोठी क्रेन पत्रीपूलाच्या बाजूला आणण्यात येणार असून आजपासून (ता. 19) 24 ऑगस्टदरम्यान रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत पत्रीपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पुल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. नव्या पत्री पूलाचे काम अंतिम टप्यात असून गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन बाजूच्या पुलावर ठेवून काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून 24 ऑगस्टपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 22 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने आजपासून खरेदीसाठी नागरिक बाजारात येणार असल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस या कोंडीचे नियोजन कसे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामार्गावरील वाहतुकीत असेल बदल 

  • कल्याणमधून पत्री पूल मार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून जनोली नाका येथून राष्ट्रीय मार्ग क्रमांक  3 वरून खारेगाव टोलनाका - मुंब्रा बायपास मार्गे पुढे जावे .
     
  • कल्याणमधून शिळफाट्याकडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असून या वाहनांनी दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूने आधारवाडीचौक, खडकपाडा चौक भवानी चौक, प्रेम ऑटो सर्कल, सुभाष चौक, वालधुनी रेल्वे ब्रीज, आनंद दिघे उड्डाणपूल मार्गे पुढे जावे.
     
  • कल्याण-नगर महामार्गावरून पत्री पूलमार्गे शिळफाटा रोडकडे जाणाऱ्या वाहनांना कल्याणमधील सुभाष चौकात बंदी असेल. या मार्गावरील वाहनांनी सुभाष चौकात डाव्या बाजूने वालधुनी ब्रीज आणि आनंद दिघे उड्डाण पुलावरून पुढे जावे. 
     
  • कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पूर्वेस जोडणारा जुना पत्री पूलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहनांना कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्व वाहने कल्याण शीळ रोडवरील कल्याण पूर्व सूचक नाका येथून उजवीकडे वळून पुढे जातील .

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT