anil parab
anil parab 
मुंबई

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब साधणार वाहतूकदारांशी थेट वेबसंवाद ; प्रवासी वाहतूक उद्योगाच्या प्रश्नांवर होणार महाचर्चा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सध्या जगभरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना महामारीमुळे सगळ्याच दैनंदिन सेवा-सुविधा ठप्प झाल्या असताना प्रवासी वाहतूक क्षेत्रालाही याचा प्रचंड फटका बसला आहे. दिवसागणिक वाढत चाललेला लाॅकडाऊन कालावधी प्रवासी वाहतूक व्यवसायिकांना संकटात घेऊन चालला आहे. 

अशा या परिस्थितीत वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत तसेच याबाबत विविध उपाययोजना आणि मागणी असलेले निवेदन बस ॲण्ड कार ॲापरेटर्स काॅन्फेडरेशन ॲाफ इंडियाचे पश्चिम विभागाचे चेअरमन तथा शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस मोहन गोयल यांनी राज्याचे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना नुकतेच दिले होते.

या निवेदनाद्वारे त्यांनी पुढील ६ महिने विविध रस्ते करात सूट, वाहन परवाने-नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र याकरीता वाढीव कालावधी, शासकीय करांमध्ये सवलती, मॅक्सी कॅब परवाने अशा अनेक मागण्या केल्या होत्या. याबाबत शासनाची भूमिका मांडण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री ॲड.अनिल परब हे सोमवारी म्हणजेच १८ मे ला  सांयकाळी ४ वाजता वेबच्या माध्यमातून वाहतूकदारांशी थेट संवाद साधणार आहेत. 

या चर्चासत्रात प्रसन्न पटवर्धन, हर्ष कोटक आणि दिपक नाईक हे वक्ते असून बस आणि कार ॲापरेटर्स काॅन्फेडरेशन ॲाफ इंडिया, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टॅंकर्स-बस वाहतूक महासंघ, मुंबई बस मालक संघटना आणि फेडरेशन ॲाफ टुरिस्ट टॅक्सी ॲापरेटर्स या संस्था सहभागी होणार आहेत. शिवाय वेबेक्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व वाहतूकदारांना नोंदणीसह चर्चेत सहभागी होता येणार आहे. 

प्रवासी वाहतूक क्षेत्राच्या प्रश्नांवर आयोजित केलेले हे देशातील पहिलेच चर्चासत्र असून ते महाराष्ट्रात परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांचे पुढाकाराने होत आहे.

transport minister anil parab will discuss with transport person read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT