child patient
child patient 
मुंबई

डॉक्टर आणि प्रशासनाने ठरवले आणि सांगलीतील अडीच महिन्याच्या बाळाचा जीव वाचला...

वृत्तसंस्था

मुंबई ः कोरोनाच्या महामारीने मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णांना रुग्णालयात किमान खाट तरी मिळावा म्हणून व्यवस्थेशी झगडावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र प्रशासन आणि दोन रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये योग्य समन्वय असला तर काहीही शक्य होऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच मुंबईत आला. आरोग्य यंत्रणेच्या नियोजनामुळे सांगलीतील एका अडीच महिन्याच्या बालकाला जीवदान मिळाले आहे. 

रोहित चव्हाण बालकाचा 16 मार्च रोजी सांगलीतील एका रुग्णालयात जन्म झाला. जन्मताच रोहितची प्रकृती नाजूक होती. जन्मानंतर अवघ्या आठवड्याभरात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे रोहितवर पुढील उपचार कसे करावे, याबाबत त्याच्या आई वडिलांना चिंता वाटत होती. सांगलीतील डॉ. लक्ष्मीकांत मगदूम यांनी रोहितची तपासणी केली. त्यात त्याच्या दोन मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. सखोल तपासणी केल्यावर फुफ्फुसाकडून यकृताकडे होणाऱ्या शुद्ध रक्ताच्या पुरवठ्यातही प्रश्न आले होते. मी माझ्या डॉक्टरी व्यवसायात या प्रकारची केस प्रथमच पाहिल्याचे डॉ. लक्ष्मीकांत मगदूम यांनी सांगितले. 

डॉ.मगदूम हे सांगलीतील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशनमघ्ये वैद्यकीय आधिकारी आहेत. डॉ. मगदूम यांनी तातडीने मुंबईत संपर्क साधला आणि मुंबईत शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. सांगलीहून मुंबईला रवाना करण्यासाठी ऑक्सिजन आणि अन्य आपात्कालीन यंत्रणेसह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या. तत्पूर्वी रोहितला मुंबईला नेण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह असल्याने पुढील सूत्रे वेगाने हलली. अवघ्या दहा तासांत रोहितला मुंबईला हलवण्यात आले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील आधिकाऱ्यांनी मुलाला सांगलीहून मुंबईला नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत हे सर्व उपचार करण्यात आले. मुंबईतील एनएच एसआरसीसी मुलांच्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या सेवाभावी रुग्णालयाने शस्त्रक्रियेचा काही खर्च उचलला. मुंबईहून सांगलीस परत येण्यापूर्वी मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली. आता मुलगा आई वडिलांसह गावी परतलाही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT