संग्रहित
संग्रहित  
मुंबई

अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि धडकी भरवणारी दरी, अडीच वर्षांच्या तिने सर केला कलावंतीण

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग तालुक्‍यातील लोणारे येथील अडीच वर्षांच्या मुलीने रविवारी माथेरान डोंगररांगेतील पनवेल-कर्जतच्या सीमेवर असलेल्या प्रबळगडाच्या कलावंतीण सुळक्‍यावर चढून तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. 71 व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा उपक्रम या मुलीने राबविला. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

माथेरान डोंगररांगेतील पनवेल-कर्जतच्या सीमेवर असलेल्या प्रबळगडाचा कलावंतीण सुळका दोन हजार 300 फूट एवढ्या उंचीवर आहे. संरक्षक आसरा नसलेल्या अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि काळजात धडकी भरविणारी खोल दरी असा हा कलावंतीण सुळका सर करताना भल्या-भल्या ट्रेकर्सना घाम फुटतो. परंतु शिवकन्या शार्विक जितेन म्हात्रे हिने प्रजासत्ताकदिनी हा सुळका कोणत्याही साधनाचा वापर न करता सर केला.

त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवून गडावर होणाऱ्या व्यसन व अस्वच्छता थांबविण्याचा संदेश फलकाद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शार्विकाच्या या धाडसी वृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. शार्विका हिने यापूर्वी असे अनेक गड पार केले आहेत. लायन्स क्‍लबच्या वतीने नुकताच या मुलीचा सत्कार करण्यात आला. 

two and half year girl waved indian flag on kalavantin durga

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT