culprit. 
मुंबई

धक्कादायक! दरवाजा तोडून दोन आरोपींचे पलायन; दोघांचेही कोव्हिड रिपोर्ट होते....

अनिश पाटील

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील अनेक तुरुंगातील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कैद्यांना किंवा आरोपींनी विशेष विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र, शिवाजी नगर येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवलेल्या दोन आरोपींनी दरवाजा तोडून नाट्यमयरीत्या पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. 

एका आरोपीविरोधात बलात्कार, तर दुसऱ्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. त्यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाण व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोघांच्याही शोधासाठी दोन पोलिस ठाण्यातील विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते.

संतोष मेहराज तिवरेकर (वय 20) व इरफान शकीर अली खान (वय 19) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनाही चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना गोवंडी येथील शिवाजी नगरमधील कोव्हिड सेंटरच्या 602 क्रमांकाच्या विलगीकरण खोलीत ठेवण्यात आले होते. त्याच्यासह तिसरा व्यक्तीलाही तेथे ठेवण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी तेथे दोन सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले होते. मात्र संसर्गजन्य आजार असल्यामुळे या सुरक्षा रक्षकांना सेंटरमध्ये प्रवेश नव्हता. 

13 जुलैच्या पहाटे आरोपींनी टणकदार धातूच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्याच्यासोबतचा तिसरा व्यक्ती उठला त्यावेळी दरवाजा बाहेरून बंद होता व दोघेही गायब होते. आरोपींसाठी नाश्ता आल्यानंतर हे दोघेही पळाल्याचे लक्षात आले. यातील तिवरेकर हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 29 जूनला एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. तर खान याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 1 जुलैला अटक करण्यात आली होती.

दोघांमध्येही कोरोनाची लक्षणे नसून दरवाजा तोडून भिंतीवरून उडी मारून त्यांनी पलायन केल्याच संशय आहे. प्राथमिक तपासात तरी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांकडून कोणतीही हलगर्जी झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
----
संपादन :  ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT