ccc. 
मुंबई

कोरोना लढ्यात आता बेस्टचा हातभार; दोन डेपोत विलगीकरण केंद्राची उभारणी...

संजय घारपुरे

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन अंमलात आले, तेव्हा उपनगरी रेल्वे बंद होती, पण अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची बस सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी बेस्ट सेवेचा चांगला उपयोग झाला. त्यापाठोपाठ आता कोरोना रुग्णांसाठी बेस्टच्या डेपोत विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहेत.

 ल्युकेमिया असतानाही 'तिने' केली कोरोनावर यशस्वी मात; 9 वर्षाच्या चिमुरडीची कहाणी... ​

मुंबईकरांसाठी लोकल रेल्वेप्रमाणेच जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या जागेत विलगीकरण केंद्र उभारली जात असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार दहिसर येथील कांदरपाडा डेपोत दोनशे बेडचे कोव्हिड केअर केंद्र सुरु करण्यात आले आहे. ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्याचवेळी दहिसर बेस्ट स्टेशनमध्येही अन्य एका केंद्राची उभारणी सुरु आहे. 

प्रत्येक वॉर्डातील कोरोना रुग्णांची संख्या पाहून मुंबई महापालिका कोरोना केअर केंद्राबाबत निर्णय घेत असते. अर्थातच या केंद्रासाठी रिकाम्या जागेची आवश्यकता असते. आता आमच्याकडे रिकामी जागा आहे आणि मुंबईकरांना मदत करण्यासाठी बेस्ट नेहमीच तयार असते असे बेस्टमधील आधिकाऱ्यांनी सांगितले. बेस्टचे मुंबईत एकंदर 27 बस डेपो, 51 बस स्टेशन आणि 112 बस टर्मिनस आहेत. 

महाराष्ट्र सरकारने 1 जूनपासून पुनःश्च हरीओम सुरु केले. तेव्हा बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 82 मार्गावर 2 हजार 132 फेऱ्या सुरु केल्या. गेल्या दीड महिन्यात फेऱ्यांसमध्ये सतत वाढ होत आहे. सध्या बेस्टच्या दोन हजार 300 बस रस्त्यावर आल्या आहेत. ताफ्यातील सर्व तीन हजार 400 बस लवकरच रस्त्यावर येतील असे सांगितले जात आहे. सध्या बेस्टचा फायदा 11 लाख प्रवाशांना रोज होत आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT