मुंबई

पुन्हा कास्टींग काऊच! तरुणींची अश्लील चित्रफीत काढणाऱ्या पॉर्नप्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश

अनिश पाटील

मुंबई : चित्रपटांत काम देण्याचे आमिष दाखवून इच्छुक तरुणींची अश्लील चित्रफिती बनवून त्या वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सवर प्रसारित करून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या पॉर्नप्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला गेलाय. गुन्हेशाखेच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मालमत्ता कक्षाचे केदारी पवार यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. गुरुवारी दुपारी 12 वाजता काही इसम महिला सहकाऱ्यांसह माढ गाव मालाड, मालवणी  येथे भाड्यानेघेतलेल्या  बंगल्यामध्ये अश्लील चित्रीकरण करून त्याचे प्रसारण विविध अ‍ॅप्लिकेशनद्वारे करणार आहेत. या माहितीच्या आधारावर मालमत्ता कक्षाने ग्रीन पार्क बंगला, ओल्ड फेरी मार्ग, मढ, मालवणी येथे छापा टाकला.

यावेळी अश्लील चित्रीकरण सुरू असल्याचे दिसून आले. हे चित्रीकरण करणाऱ्या महिलेच्या चौकशीत तिचे हॉट हिट मुव्हिज नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन असून त्यावर तिने आणि तिच्या सहकार्याने अश्लील चित्रीकरण केलेले अश्लील व्हिडिओ अपलोड केले जात असल्याचे आढळून आले.  पाहण्यासाठी सबक्रिप्शन चार्जेस आकारले जात असल्याचे देखील चौकशीत सांगितलं गेलंय. 

अशाप्रकारे अनेक वेबसाईट्स आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे अश्लील व्हिडिओ प्रसारित करून पैसे कमावले जात असल्याचे उघड झाले आहे. यासाठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याच्या नावाखाली अश्लील व्हिडिओत काम करण्यास भाग पडून त्यांची फसवणूक केली जाते.

याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाचजणांना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल, कॅमेरे, कॅमेरा लेन्स, लॅपटॉप, स्पॉट लाईट्स, ट्रॉयपॉड स्टॅण्ड आदी चित्रीकरणासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या हस्तगत केलेल्या मुद्देमालाची पाच लाख 58 हजार एवढी किंमत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी यातील आरोपींनी गैरप्रकारातून प्राप्त केलेली 36 लाख 60 रुपयांची रक्कम देखील गोठवली आहे. यातील आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

two people arrested from mumbai for filming obscene videos of girls

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT