shramik special 
मुंबई

..अन 'त्यानं' ट्रेनच्या डब्यातच सोडले प्राण; अन्न-पाण्याशिवाय धावतायेत श्रमिक ट्रेन.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे रोजगार गेले. त्यामुळे काही श्रमिकांनी कुटुंबासह पायी जाण्याचा मार्ग निवडला तर काही सरकार काहीतरी मदत करेल या आशेत राहिले. मात्र पायी जाणं असो वा श्रमिक ट्रेन या दोन्ही ठिकाणी या श्रमिकांच्या वाट्याला येतायेत त्या फक्त मरण यातना. गावी जाण्याचा आनंद असतो मात्र ६०-६० तास चालणाऱ्या या ट्रेनमध्ये अन्न-पाण्यावाचून या श्रमिकांना प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात जाणाऱ्या श्रमिक ट्रेनमध्ये घडला आहे.     

श्रमिक स्पेशल वाराणसीतील मंदुआदिह स्टेशनवर बुधवारी सकाळी ८.२० वाजता पोहोचली. ही ट्रेन सोमवारी सकाळी ११ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघाली होती. मुंबईहून दीड हजारांना स्थलांतरीतांना ही ट्रेन घेऊन आली होती. मुंबईहून वाराणसीला आलेल्या दोघा स्थलांतरांचे श्रमिक स्पेशलमध्येच निधन झाल्याचे आढळले सर्व स्थलांतरीत खाली उतरत असतानाच दोघांचे निधन झाले असल्याचे रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले. 

दशरथ प्रजापती वय ३० असं या मृत्यू झालेल्या श्रमिकाचं नाव आहे. हा श्रमिक दिव्यांग होता. त्याची प्रकृती अलाहाबादपासून खालावली होती. ट्रेन अंतिम स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी त्यांची काहीही हालचाल होत नव्हती, तो काही दिवसांपासून आजारी असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

याच ट्रेनच्या अजून एका डब्यात अन्य एका डब्यात मृत आढळलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्यांचे वय ५० असल्याचे सांगण्यात आले. दोघांचेही शव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा:दहशतवादी कसाबला फासापर्यंत पोचवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन
 

श्रमिक ट्रेनममध्ये प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यात या ट्रेन निर्धारीत मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने चालवल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. अनेक स्थलांतरीतांवर ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी काही तास उन्हात उपाशी उभं राहण्याची येत आहे. त्यातच उत्तर भारतातील तापमान वाढत आहे त्यामुळे अन्न आणि पाण्याशिवाय या श्रमिकांवर जीव गमावण्याची वेळ येतेय.  

two people have died in shramik train read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT