Murder Sakal
मुंबई

भाईंदरमध्ये दोन वर्षीय मुलीची हत्या; आदिल खान जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील मुर्धागाव येथे मानलेल्या पित्यानेच दोन वर्षीय मुलीची (two year child murder) ती सारखी रडत असल्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीसांनी आदिल खान या आरोपीला (Adil khan arrested) याप्रकरणी अटक केली आहे. भाईंदर पोलीसांनी (bhayandar police) दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मुर्धा गाव येथे एक दोन वर्षाची मुलगी राहत्या घरी मयत झाल्याची तक्रार दाखल भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

मात्र मुलीच्या उत्तरीय तपासणित तीचा तोंड व नाक दाबल्याने मृत्यु झाल्याचे तसेच डोक्याला पाठीमागे मार लागून जखम झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुलीची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी मुलीच्या आईला बोलावून अधिक चौकशी केली असता मुलीच्या मानलेल्या पित्यानेच हत्या केली असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले.

हत्या झालेल्या मुलीची आई मुर्धा गावात तिच्या मानलेला पती आदिल खान व आपल्या दोन वर्षीय मुलीसह राहत होती. ही महिला नोकरी करते तर आदिल खान रिक्षा चालवण्याचे काम करतो.  महिलेला कामासाठी बाहेर जावे लागत असल्याने तिचा पती रिक्षा चालवून मुलीला सांभाळत असे. मात्र मुलगी लहान असल्याने ती नेहमी रडत व चिडचिड करत होती त्यामुळे त्याला तिचा राग येत होता. याबाबत त्याने अनेकदा महिलेकडे तक्रार देखील केली होती.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे महिला कामासाठी गेली होती. ही संधी साधून आदिल खान याने मुलीचे नाक व तोड दाबून तीची हत्या केली. त्यानंतर संशय येऊ नये यासाठी त्याने मुलीच्या आईला फोन करून सांगितले की मुलगी मोबाईलसोबत खेळत असताना बंद गॅसच्या शेगडीवर पडली असून तिच्या नाका तोंडास मार लागून रक्त वाहत असल्याने तीला उपचारासाठी दवाखान्यात आणले आहे. मात्र डॉक्टरांनी मुलगी मरण पावल्याचे सांगताच तो तेथून पळून गेला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम बी पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात घसरण; चांदीही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, कर्करोगाच्या आजारामुळे आईचं दु:खद निधन

Humanity Story: कोवळ्या जीवांना मिळतो मायेचा स्पर्श; नवजात शिशू अतिदक्षता विभागात ख्रिसमसच्या पर्वावर अवरतला ‘पर्पल सांता’..

Latest Marathi News Live Update : मनसेचा आज मुंबईत पहिला मेळावा, राज ठाकरे करणार संबोधित

SCROLL FOR NEXT