Aarey Metro Car Shed Controversy esakal
मुंबई

आरे कारशेडच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं सरकारला भावनिक आवाहन

"माझी हात जोडून विनंती आहे की माझा राग मुंबईवर काढू नका"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नव्यानं स्थापन झालेल्या राज्यातील शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुंबईतील मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा निर्णय बदलून तो पुन्हा आरेमध्ये करण्याला मान्यता देण्यात आली. या बदललेल्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारला भावनिक आवाहनही केलं आहे. शिवसेनाभवनात पत्रकारांशी ते बोलत होते. (Uddhav Thackeray emotional appeal to the govt after new decision of Aarey Metro Car Shed)

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज पहिल्यांदा तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे. माझ्यावर राग आहे ना तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय नव्या सरकारनं बदलला याचं मला खरोखर दुःख झालेलं आहे. आरे हा कोणाचा खासगी प्लॉट नाही. तिकडे कुठल्याही बिल्डरला आपण आंदन दिलेलं नाही. पर्यावरणासाठी आवश्यक असलेली वनराई होती, त्यावर एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली. त्यासाठी मी कांजूरमार्गचा पर्याय दिला होता. मी पर्यावरणाच्या सोबत होतो. ज्यावेळेस संभ्रम निर्माण होतो तेव्हा हा विषय टाळलेला बरा. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, की माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका." (Aarey Metro Car Shed Controversy)

कांजूरमार्गचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याच्यात कुठेही अहंगड नाही, मी मुंबईकरांच्यावतीनं हात जोडून त्यांना विनंती करतोय की, आपला आग्रह रेटू नका ज्यामुळं पर्यावरणाला हानी पोहोचेल. आरेत आता झाडं तोडून झालेली नाहीत, काही छायाचित्रकरांना तिथं बिबट्याचंही दर्शन झालं आहे. म्हणजे तिथं वन्यजीवन अद्याप आहे. मुंबईतलं ८०० एकरचं जंगल आम्ही राखीव केलं आहे. केंद्रात आणि राज्यात आता तुमचंचं सरकार आहे. त्यामुळं आरेचा निर्णय रेटू नका. कारण कांजूरमार्गला कारशेड झाल्यास ही मेट्रो पुढे बदलापूर अंबरनाथ पर्यंत जाऊ शकते. हा माझ्या मुंबईकरांच्यावतीनं आग्रह आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'आरोग्‍य विभागात दिवाळीऐवजी शिमगा'; सेवक, सहाय्‍यकांचे पगार थकले; कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा..

Soybean Guaranteed Price:'सोयाबीन हमीभाव केंद्रासाठी खर्डाभाकरी आंदोलन'; कऱ्हाडला शेकाप, रासप, बळीराजा शेतकरी संघटनेची संयुक्तपणे घोषणाबाजी

Festive Makeup For Bride: लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे? मग लक्ष्मीपूजनासाठी करा असा झटपट मेकअप!

गावगुंड होणार तडीपार! झेडपी, महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर पोलिसांनी तयार केली रेकॉर्डवरील ६७०० गुन्हेगारांची यादी; अनेकांवर ‘एमपीडीए’चीही कारवाई

मोठी बातमी! राज्यातील पगारावरील एक लाख शिक्षक २३ नोव्हेंबरला देणार ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात,...

SCROLL FOR NEXT