esakal

मुंबई

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Thackeray reaction: जाणून घ्या, नेमक्या कोण दोन व्यक्ती सांगितल्या आहेत उद्धव ठाकरेंनी; बिहारमधील एका घटनेचाही दिला दाखला

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray carefully inspecting the Meenatai Thackeray statue: मुंबईतील दादर भागातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना करण्याचा प्रय़त्न झाल्याचे आज समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, पोलिस यंत्रणाही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तातडीने कामाला लागली आणि पुतळा परिसरात कडकोट बंदोबस्त तैनात केला गेला.

पुतळ्याची बारकाईने पाहणी -

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्षाच्या खासदार, आमदार अन् नेत्यांसह शिवाजी पार्कवर जाऊन पुतळ्याची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मनेसे नेते बाळानांदगावकरही होते. उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची बारकाईने पाहणी केली आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तर उद्धव ठाकरे येण्याआधीही स्थानिक शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता केली होती. कारण, मीनताई ठाकरेंचा पुतळा हा उद्धव ठाकरे आणि समस्त शिवसैनिकांसाठी अत्यंत भावनिक आणि संवेदनशील विषय आहे.

उद्धव ठाकरे  नेमकं काय म्हणाले? -

पुतळ्याची पाहणी केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘’आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे. एकतर यामागे अशी व्यक्ती अशू शकते की ज्याला स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटते. अशा कुणीतरी लावारीस माणसाने हे केलं असेल. नाहीतर बिहारमध्ये ज्याप्रकारे मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला. म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक अयशस्वी प्रयत्न केला गेला. असा कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्यासाठीचा हा उद्योग असू शकेल. तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहेत. आम्ही सर्वांना शांत राहण्यास सांगितलं आहे, बघूयात पुढे काय होतं.’’

तसेच, ‘’मी पुन्हा एकदा सांगतो दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती यामध्ये असू शकतात, की ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटते, अशा कुणीतरी बेवावरस व्यक्तीने हे केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदींच्या मातोश्रींचा अपमान केला गेला, ते निमित्त करून जसा बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आजचा हा प्रयत्न असू शकतो.’’ असं यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.

प्राप्त माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या आधी मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले होते. शिवाय, दिवसभरात अनेक नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्ते येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT