मुंबई

Ulhasnagar Mnp: उल्हासनगरात दुरावस्थेतील चेंबर्सची झाकणे एका फोनवर बदलणार!

Ulhasnagar Mahapalika Helpline Number: महानगरपालिकेचे हेल्पलाईन नंबर जाहीर, फोटो वॉट्सअप वर टाकल्यास महानगरपालिके मार्फत सदरचे झाकण बदलणे सोईस्कर होईल

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Thane Latest Update | गटारांवरील नादुरुस्त,दुरवस्था झालेल्या व तुटलेल्या अवस्थेत असलेल्या झाकणांना आता एका फोनवर बदलण्याचा सकारात्मक निर्णय उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी घेतला आहे.

त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता,उपअभियंता,कनिष्ठ अभियंता यांचे वॉट्सअप हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.

शहरात वसावसाहतीत गटारे बांधण्यात आलेली त्यावर चेंबर्स टाकण्यात आली असून त्यांची संख्या अनगिनत आहे.चेंबर्स वरील झाकणे निखळली,तुटली तर त्यावरुन चालताना अनेकदा दुर्घटना घडण्याची शक्यता असते.हा सर्व विचार करून आयुक्त डॉ. अझिझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रभागनिहाय चेंबर्सची जबाबदारी सोपवली आहे.

त्यासाठी शहर अभियंता तरुण शेवकानी,उपअभियंता संदीप जाधव,कनिष्ठ अभियंता कोमल आशान,रुचिका कारंडे,राहुल जाधव,पल्लवी वैरागर,हर्षद प्रधान यांचे वॉट्सअप हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.

आपण राहत असलेल्या परिसरात गटारा वरील चेंबरची झाकणे नादुरूस्त झाली असतील किंवा चेंबर कव्हर नाहीत अशा ठिकाणाचे फोटो खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर (मोबाईल नंबर) वर वॉट्सअप वर टाकल्यास महानगरपालिके मार्फत सदरचे झाकण बदलणे सोईस्कर होईल व पुढील अनुचित घटना टाळता येईल असे आवाहन किशोर गवस यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT