WHATS APP  sakal media
मुंबई

व्हॉट्सॲपवरून अनोळखी व्यक्तीकडून महिलेची फसवणूक; ४६ लाखांना गंडा

सायबर गुन्हेगारांच्या टोळीने घातला ४६ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून (What's app) एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे सानपाडा भागात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत व्हॉट्सॲपवरून मैत्री केली त्या व्यक्तीने परदेशातून सोन्याचे दागिने (Gold jewelry), ८० हजार पाऊंड, लेदर शूज, बॅग, परफ्युम गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने या महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल ४५ लाख ९० हजार ५०० रुपये पाठवण्यास भाग पाडून तिची फसवणूक (Money Fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांच्या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल (police complaint filed) करून तपासाला सुरुवात केली आहे.

फसवणूक झालेली ४८ वर्षीय महिला कुटुंबासह सानपाडा परिसरात राहण्यास आहे. ही महिला एका नामवंत बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करते. गत डिसेंबर महिन्यात ही महिला बँकेत कामावर असताना, एका सायबर गुन्हेगाराने डॉ. गार्लेन या नावाने तिच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तिच्यासोबत ओळख वाढवली. यावेळी सायबर गुन्हेगाराने तो युकेत प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असल्याचे सांगितले. तसेच, इंडियन ग्रुपमधून महिलेचा मोबाईल नंबर मिळाल्याचे सांगितले. महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चॅटिंग सुरू केली. त्यानंतर डॉ. गार्लेन याने या महिलेविषयी वैयक्तिक माहिती मिळवून तिच्या जन्मतारखेपूर्वी तिला गिफ्ट पाठवून देत असल्याचे सांगून तिचा पत्ता मागून घेतला. काही दिवसानंतर तिला गिफ्ट पाठवल्याचे सांगितले.

त्यानंतर काही दिवसातच त्याच टोळीतील दीक्षा नावाच्या महिलेने दिल्ली कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचे भासवून या महिलेला संपर्क साधला. पार्सलचे २ लाख १० हजार रुपये कस्टम चार्जेस भरण्यास सांगितले. महिलेने डॉ. गार्लेनला संपर्क साधून गिफ्टबाबत खातरजमा केली असता, त्याने ८० हजार पाऊंड करन्सी, बॅग, परफ्युम, तसेच सोन्याचे दागिने गिफ्ट पाठल्याचे सांगून कस्टम चार्जेस भरून गिफ्ट ताब्यात घेण्यास सांगितले. त्यामुळे या महिलेने दीक्षाच्या खात्यात २ लाख १० हजार रुपये पाठवून दिले.

त्यानंतर दीक्षाने पुन्हा या महिलेला संपर्क साधून दागिन्यांचे कस्टम चार्जेस ४ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने या टोळीने पीडित महिलेकडून तब्बल ४५ लाख ९० हजार ५०० रुपये उकळले. त्यानंतर देखील तिला आणखी ११ लाख ७८ हजार रुपये भरण्यास सांगण्यात येऊ लागले. मात्र सदर महिलेने पैसे भरू शकत नसल्याचे सांगितल्यानंतर समोरील महिलेकडून पैसे भरले नाही तर कस्टम विभागाकडून तिला अटक केली जाईल, अशी भीती दाखविण्यात आली. त्यामुळे या महिलेने घाबरून याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी तिची फसवणूक झाल्याचे तिला सांगितले. त्यानंतर तिने नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT