Wada Farms sakal media
मुंबई

वाडा : अवकाळी पावसाचा शेतीला फटका; हरभरा व कलिंगड पिकाचे नुकसान

नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

संदिप पंडित

विरार : गेल्या आठवड्यात दिवस-रात्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने (Untimely rain) वाडा (Wada) तालुक्यातील कलिंगड व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान (watermelon and gram farming loss) झाले आहे.अलिकडेच लागवड केलेली कलिंगडाची रोपे मरुन जाऊन अक्षरशः त्यांचा चिखल झाला आहे. वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे चार हजार हेक्टर क्षेत्र असुन या क्षेत्रातील निम्मे पिक गेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त केले आहे.

विशेषतः हरभरा, मुग, वाल या रब्बी पिकांना या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या नुकसान भरपाईची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे शेतकऱ्यांनी केली आहे. वाडा तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कलिंगड, खरबूज पिकांची लागवड करतात. यावर्षी काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील विविध गावांमध्ये 30 ते 35हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात दिवसरात्र कोसळलेल्या पावसाने कलिंगड, खरबूजाची लागवड केलेल्या शेतांची तळे करुन टाकली.

शेतांमध्ये एक ते दिड फूट उंचीपर्यंत पाणी बारा ते पंधरा तास भरुन राहिल्याने कलिंगडाची रोपे मरुन गेली आहेत. शेतात रोप दिसत नसून चिखल झालेला दिसून येत आहे. कलिंगड पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. मोठा खर्च वाया गेल्याने कलिंगडाची लागवड केलेले शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. सांगे येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी तीन एकर क्षेत्रावर केलेली कलिंगड पिकाची लागवड संपूर्ण उध्वस्त झाली आहे. तर अंबिस्ते बुद्रुक येथील संजय पाटील या शेतकऱ्याच्या दोन एकर क्षेत्रावरील कलिंगड पिक अवकाळी पावसाने जमीनदोस्त केले आहे.

कलिंगड पिकासाठी प्रति एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च येत असतो, हा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडले आहेत. हरभराचे उत्पन्न घेणा-या शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हरभरा पिकांमधील शेतांमध्ये गुडघाभर पाणी भरल्याने हे पीकसुद्धा उध्वस्त झाले आहेत. मूग, वाल या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रब्बी, भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच विज उत्पादन करणारे व्यावसायिक यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व जास्तीत जास्त या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील बाधीत शेतकऱ्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT