water scarcity in uran  sakal
मुंबई

Uran News: करंजा गावामध्ये पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; नागरिक हैराण

करंजा-कोंढरी परिसर हा उरण तालुक्यातील सर्वांत मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे

सकाळ वृत्तसेवा

Uran News: उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वांत मोठे गाव समजल्या जाणाऱ्या करंजा गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्‍याने ग्रामस्‍थ मेटाकुटीला आले आहेत. कित्येक वेळा आंदोलन, मोर्चे काढून गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्‍थांकडून रोष व्‍यक्‍त केला जात आहे.

उरण शहरापासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या करंजा गावातील ग्रामस्‍थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंधरा दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून करंजा गावातील नागरिकांच्‍या पाणी प्रश्नावर अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही.

त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आणखी किती वर्षे पाणीटंचाई सहन करायची, असा सवाल करंजा येथील ग्रामस्‍थ करत आहेत. करंजा-कोंढरी परिसर हा उरण तालुक्यातील सर्वांत मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे. या भागामध्ये जवळजवळ २५ ते ३० हजार लोकसंख्या आहे. एकीकडे शासनाच्या माध्यमातून ‘हर घर जल’ ही योजना राबवली जात आहे; तर दुसरीकडे करंजा ग्रामस्थांना मात्र पाणी प्रश्नासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे; मात्र तरीही प्राणी प्रश्न काही सुटत नसल्यामुळे ग्रामस्‍थ मेटाकुटीला आले आहेत.

करंजा ग्रामस्थांनी अनेकदा पाणी टंचाईविरुद्ध अनेक आंदोलने केली आहेत. यामध्ये करंजा ग्रामस्थांच्या माध्यमातून पाणीटंचाईप्रकरणी रोष व्यक्त करण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्यात आला होता. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मार्च महिन्यात उरण तहसील कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चादेखील काढण्यात आला होता; मात्र लोकप्रतिनिधी तसेच शासनाकडून नुसते आश्‍वासन देण्यात येते.

गावातील नागरिक पाणी प्रश्नामुळे अत्यंत त्रस्‍त झाले आहेत. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पंधरा दिवसांतून एकदा येणारे पाणी यामुळे पाण्याचे नियोजन कसे करावे, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी व शासनाच्या माध्यमातून अजूनही आमच्या गावाचा पाणी प्रश्न सुटलेला नाही.
प्रीतम म्हात्रे, ग्रामस्थ, करंजा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT