Chitra Wagh Esakal
मुंबई

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

BJP Chitra Wagh allegations On Shiv Sena UBT Election Advt: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये एका पॉर्नस्टारचा वापर केला गेला असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी या वेळी काही फोटो देखील दाखवले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती येत असतात. त्यात अदुबाळ नाईटलाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट कंपनीच्या उबाठाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टारचं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

ठाकरे गट राज्यात पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. तोच पॉर्नस्टार विचारतो की, महिलांचे अत्याचार कधी थांबणार? हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलीसोबत अश्लील चित्रण करतो. बापाची भूमिका करणारा हा व्यक्ती उल्लू ऍपवरती घाणेरडे कृत्य करताणाच्या क्लिप आहेत, असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील एक महिला म्हणून आई, माता, मुलगी म्हणून माझी मान शरमेनं खाली गेली आहे. निवडणुकीच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कायम महिलांचा अपमान करण्यात आला आहे. अमरावतीमधील महायुतीच्या उमेदवार असू द्या. ठाकरे गटाच्या नेत्यांनी महिलांचा अपमान वांरवार केला आहे, असं वाघ म्हणाल्या.

मला ठाकरेंना विचारायचं आहे. छत्रपती महाराजांच्या राज्यात कोणती संस्कृती आणण्याचा आपण प्रयत्न करत आहात. अशा प्रकारच्या बाप जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं दाखवणार आहात का? असं चित्रा वाघ म्हणाल्या.

ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती. त्यांचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी यावेळी एक फोटो देखील समोर आणला आहे. संबंधित व्यक्ती हा पॉर्नस्टार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT