मुंबई

वापरलेले पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 19 : कोरोनातील वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकणाऱ्या नर्सिंग होम तसेच रूग्णालयांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

अँटॉप हिल सेक्टर 6 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सीजीएस कॉलनी जवळील सिपीडब्ल्यूडी च्या मैदानात हे कोरोना रूग्णालयांत वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकण्यात आली आहेत. मैदानाच्या कोपऱ्यात वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा  खच पडल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.

सीजीएस कॉलनीजवळ असलेल्या मैदानात आसपासच्या परिसरातील मुलं खेळण्यासाठी एकत्र जमतात. अशाच प्रकारे काही मुलं खेळण्यासाठी एकत्र आली असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. मैदानात फेकलेल्या कच-यात ब-याचदा वापरलेली इंजेक्शन,औषधांच्या रिकाम्या बाटल्या यांचा ही समावेश असतो. सुरूवातीला मुलांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून तो कचरा स्वता साफ केला. त्यानंतर मात्र हा प्रक्रार दररोज होऊ लागला.

गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार दररोज घडत असल्याचे येथील रहिवासी विनित शिंगारे यांनी सांगितले. पीपीई किटचा कचरा आम्ही स्वता दोनदा जाळला असल्याचे ही ते सांगतात. मात्र आता पीपीई किट सह मास्क, हातमोजे, इंजेक्शन, औषधांच्या बाटल्यांचा कचरा ही होऊ लागला आहे. कोरोना काळात शासन काळजी घेण्याचे सांगत असतांना अश्या प्रकारे उघड्यावर कचरा फेकल्याने रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी भिती ही शिंगारे यांनी व्यक्त केली. 

जैविक कच-याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त  गजानन बेल्लाळे म्हणालेत.  

used PPE kits are thrown in open serious health issues may occur to the citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT