mumbai Sakal
मुंबई

मुंबईत दोन दिवस लसीकरण बंद

कोविड प्रतिबंध लसीकरण पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड-19 (Covid-19) प्रतिबंध लसीकरण (Vaccination) मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका (Mumbai Municiple) क्षेत्रातील शासकीय (Gov.) आणि महानगरपालिका लसीकरण (Vaccination) केंद्रांवर उद्या गुरुवारी (Thursday) 19 आणि शुक्रवारी 20 ऑगस्ट या दिवशी लसीकरण बंद राहणार आहे.

दरम्यान, बुधवारी ही बर्‍याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीची उपलब्धता नसल्याने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे पण, आतापर्यंत अनेकदा मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यातुन मुंबईकरांची गैरसोय होते. आजही बर्‍याच ठिकाणी लसीकरण बंद असल्याने लोकांनी रांग लावूनही डोस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पालिकेला अद्याप तरी लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT