vaccine
vaccine  
मुंबई

मोठी आनंदाची बातमी! ऑक्सफर्डनं तयार केलेली कोरोनावरील लस यशस्वी मार्गावर..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सध्या कोरोना व्हायरसनं जगभरात विळखा घातला आहे. या व्हायरसनं लाखो लोकांचं जीव घेतला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर मात करण्यात यश आलं नाही. कोणत्याही देशानं कोरोनावर लस किंवा ठोस उपाय त्यावरील औषध शोधलं नाही आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी जवळपास 100 हून अधिक देश याची लस शोधण्यासाठी मेहनत करत आहेत. या संसर्गवर औषध शोधण्यासाठी देशादेशात युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेनर इन्स्टिट्यूटनं लस विकसित केली आहे. 

या लसीच्या चाचण्या सध्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहेत. सध्या मानवी चाचण्या सुरू असलेली कोरोना व्हायरस विरोधी लस यशस्वी होण्याची शक्यता 50 टक्के असल्याचं इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अ‍ॅड्रियन हिल यांनी म्हटलंय. 

आम्ही तयार करत असलेल्या लसीच्या एक हजार मानवी स्वयंसेवकांवर चाचण्या घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र ब्रिटनमधील परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसच्या संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या चाचण्यांची यशस्वीपणे तपासता येण्याची शक्यता सध्या तरी फक्त 50 टक्के दिसत असल्याचं डॉ. हिल यांनी लंडनमधल्या इंडिपेंडंट या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे व्हायरसशी कमी होणारी साथ आणि वेळ यांच्याशी आम्हाला स्पर्धा करावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात  ChAdOx1 nCoV-19 लस परिणामकारक ठरली असून सहा माकडांना SARS-CoV-2 व्हायरसचा डोस दिला गेला. याच व्हायरमुळे जगभरात Covid-19 चा फैलाव झाला.  या लसीच्या मानवी चाचणी संशोधनात जवळपास 1 हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांनी ऑक्सफर्डनं केलेल्या कोरोनावरील लस चाचणीच्या निष्कर्षांचे कौतुक केलंय. 

ज्या माकडांना कोरोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नसल्याचं डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितलं आहे. पेन्नी हे लंडनच्या किंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. संशोधनामध्ये काही नकारात्मक गोष्टी समोर आल्या तर पुढे मानवी चाचणीमध्ये अडथळा निर्माण होतो. लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचण्या सुरु होणारेत. 

पुण्यात कोरोनाची लस विकसित:

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची भारतात क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. ग्लेनमार्कने फाविपीराविर (Favipiravir) नावाची लस तयार केली असून केडिला हेल्थकेयरने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी alfa-2b नावाची लस बनवली आहे. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे.  पहिल्या सहा महिन्यात 50 लाख डोस तयार केले जातील. त्यानंतर हे उत्पादन महिन्याला 1 कोटी डोस इतके वाढवण्याची योजना आहे.

vaccine made by oxford is on its way to be successful must read story 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT