Varavara Rao 
मुंबई

वरवरा राव यांची प्रकृती बिघडली; जे.जे. रुग्णालयात केले दाखल...

सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी मागील दोन वर्षांपासून अटकेत असलेले तेलगु कवी वरवरा राव (वय 81) यांना आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे जे.जे. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरवरा राव यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

आज सकाळी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या रुग्णालयाकडून करण्यात आल्या. त्यांची कोव्हिड चाचणीही करण्यात आली आहे, मात्र त्याचा अहवाल समोर आलेला नाही. मागील दोन वर्षापासून वरवरा राव तळोजा कारागृहात आहेत. मात्र, वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक आजार असून त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली होती. याआधीही कारागृहात त्यांना चक्कर आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची नियमित तपासणी करण्यास कारागृह प्रशासनाला सांगितले होते. मात्र, नियमित तपासणी केली जात नाही असा आरोप त्यांनी जामीन अर्जामध्ये केला आहे. 

शनिवारी फोनवरून बोलताना त्यांना त्रास होत होता, त्यामुळे तातडीने त्यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने देण्यात आली. आज त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी स्वखर्चाने करायला परवानगी द्यावी, अशी मागणी ही याचिकेत केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तेलतुंबडे यांचाही जामिनासाठी अर्ज
एल्गार परिषदमधील अन्य एक आरोपी विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी ही जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. अटक होऊन नव्वद दिवस झाले तरी एनआयएने आरोपपत्र दाखल केले नाही, त्यामुळे जामीन द्यावा अशी मागणी अर्जामध्ये केली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT