Vasant More pune esakal
मुंबई

Vasant More: पुण्यातील राजकारणात मोठा बदल! 25 नगरसवेक तर 5 आमदार? ठाकरेंनी वसंत तात्यांना कोणती जबाबदारी दिली?

Vasant More News in Marathi: उद्धव ठाकरे यांनी मोरे यांचे स्वागत करत म्हणाले, "वसंतराव, तुमच्या सहकाऱ्यांसह स्वागत आहे. पुण्यात शिवसेना पूर्वीपेक्षा जास्त वाढवली पाहिजे ही जबाबदारी आहे.

Sandip Kapde

पुण्यातील प्रसिद्ध नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी वंचित बहूजन आघाडी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. लाखो समर्थकांसह मातोश्रीवर दाखल होत त्यांनी शिवबंधन बांधले. या प्रवेशासह ठाकरेंनी पुण्यात आपली पकड मजबूत केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

वसंत मोरे यांनी या वेळी बोलताना पुण्यात शिवसेना बळकट करण्याचा शब्द दिला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत सांगितले की, "१९९२ मध्ये शिवसेनेत सामील झालो आणि वयाच्या ३१ व्या वर्षी विभाग प्रमुख झालो." तसेच, भविष्यात पुणे शहरात किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे अभिप्राय

संजय राऊत यांनी मोरे यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, "तात्या लोकसभा निवडणूक लढले आणि त्यांचे शेवटचे डेस्टिनेशन मातोश्री आहे."

उद्धव ठाकरे यांनी मोरे यांचे स्वागत करत म्हणाले, "वसंतराव, तुमच्या सहकाऱ्यांसह स्वागत आहे. पुण्यात शिवसेना पूर्वीपेक्षा जास्त वाढवली पाहिजे ही जबाबदारी आहे. एकेकाळी पुण्यात शिवसेनेचे ५ आमदार होते ते काम पुन्हा करायचं आहे. आपल्याला सत्ताबदल करायचा आहे."

पुण्यात शिवसेना बळकट करण्याचा संकल्प-

वसंत मोरे यांनी सांगितले की, "पुणे शहरात किमान २५ नगरसेवक निवडून आणणार." तसेच, त्यांच्या सोबत १२ मार्चला मनसेचे पदाधिकारीही आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मोरे यांना शुभेच्छा दिल्या.

वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने पुण्यातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 24 बांगलादेशी नागरिक ताब्यात, तृतीयपंथीयांची संख्या अधिक

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT