Vehicles
Vehicles Representative Image
मुंबई

नवीन वाहनांच्या ऑनलाईन नोंदणीला 'ग्रीन सिग्नल'

प्रशांत कांबळे

नव्याने विकत घेतलेल्या वाहनांच्या नोंदणीस ब्रेक लावण्यात आला होता.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन खरेदी होणाऱ्या वाहन नोंदणीला 1 मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला होता. मात्र, शासन आदेशापूर्वी तसेच गुढीपाडवा सणानिमित्त विक्री झालेल्या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे. यामध्ये मोटार वाहन निरिक्षक वाहनांची पाहणी करणार नसून ऑनलाईन पद्धतीनेच या वाहनांची नोंदणी केली जाणार आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंध लावण्यात आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने ही स्वतंत्र आदेश काढून फक्त ऑनलाईन कामकाज केल्या जाणार अशा सुचना काढल्या होत्या, त्याशिवाय नविन वाहनांची नोंदणी सुद्धा थांबविण्यात आली होती. मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशापुर्वीच खरेदी झालेली आणि गुढीपाडव्याचे औचित्त साधून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी प्रलंबीत असल्याने अशा वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांनी केली होती. त्यानुसार आता 13 एप्रील पुर्वी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिवहन आयुक्तांनी तशी परवानगी दिली आहे.

यामध्ये नविन वाहनांच्या चॅसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज फॉर्म क्र. 2021 विमा पुरावा व पत्त्याचा पुरावा वितरकांनी प्रमाणीत केलेला अर्ज वाहन नोंदणीसाठी स्विकारल्या जाणार आहे. संपुर्ण अर्ज वाहन वितरकांना अर्जाची स्कॅन कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवायची आहे. तर वाहनांचे नोंदणी शुल्क व कर, वाहन 4.0 प्रणालीवर भरुन घेऊन, मोटार वाहन निरिक्षक व नोंदणी अधिकाऱ्यांने संगणकावर मान्यता दिल्या जाणार आहे.

शासन आदेशापुर्वीच वाहन विक्रेत्यांचे वाहन खेरदी व्यवहार झाले होते. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुद्धा नागरिकांनी वाहन खरेदी केली. अशा वाहनांची नोंदणी करण्यासाठी वितरकांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे 13 एप्रील पुर्वी खरेदी झालेल्या वाहनांचीच नोंदणी होणार आहे.

- अविनाश ढाकने, आयुक्त, परिवहन विभाग

अशा आहे महत्त्वाच्या सूचना

- वाहन वितरकांनी कागदपत्रे तपासल्याच्या प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चॅसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.

- वाहन वितरकांनी वरील प्रमाणे अर्ज सादर करतेवेळी एक हमीपत्र सादर करावे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT