मुंबई

मोठी बातमी - वर्सोवा, जुहू गावासह सात वस्त्या होणार टोटल सील.. आता अंधेरी पॅटर्न

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम विभागातील वर्सोवा, जुहू गावासह सात वस्त्या सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या वस्त्यांमध्ये एक लाख 20 हजारांहून अधिक लोकसंख्या आहे.

के पश्चिम म्हणजे विलेपार्ले ते जोगेश्वरीपर्यंतच्या पश्चिमेकडील भागातील 255 ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. त्यापैकी 73 ठिकाणे झोपडपट्ट्यांमधील आहेत. या झोपडपट्ट्यांमधून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने संपूर्ण परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्सोवा गाव, जुहू कोळीवाडा, आनंद नगर, जुनेद नगर, गावदेवी डोंगरी (गिल्बर्ट हिल), जुहू गल्ली हे भाग सील करण्यात येतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. जुहू कोळीवाड्यातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आहे. या भागांमधून नवे रुग्ण येणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

एखादा परिसर सील केल्यानंतर तेथील रहिवाशांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे आव्हान असते. त्यासाठी सध्या नियोजन करण्यात येत असून, पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वच्छतागृहांची साफसफाई : 

सील केलेल्या भागात झोपडपट्ट्या असल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी एका कामगाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

versova juhu gaon and seven different localities will be sealed and andheri pattern will be implemented

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Latest Marathi News Live Update : रे रोड येथे हत्येचा प्रयत्न; क्रेन ऑपरेटरवर लोखंडी रॉडने हल्ला

SCROLL FOR NEXT