चाकरमान्यांची एसटीकडे पाठ; निर्बंधाच्या अडथळ्यामुळे धावल्या केवळ 220 बस! 
मुंबई

चाकरमान्यांची एसटीकडे पाठ; निर्बंधाचा अडथळ्यामुळे धावल्या केवळ 220 बस!

राहूल क्षीरसागर

ठाणे : यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, कोकणात गणेशोत्सवासाठी जायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत होती. त्यात राज्य परिवहन महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून 397 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटाबरोबरच विलगीकरणाचा प्रश्न तसेच नियोजनासाठी मिळालेले कमी कालावधी आदींमुळे यंदाच्या वर्षी नियोजनात करण्यात आलेल्या जादा गाड्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 397 पैकी केवळ 220 बसेसच कोकणात धावल्या असल्याची माहिती ठाणे एसटी नियंत्रक विभागाकडून देण्यात आली. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणावरदेखील काही निर्बंध आले आहेत. त्यात खासगी बसेसकडून आकारण्यात येणारे जादा भाडे, ई पास आदी कारणांमुळे गणेशोत्सवासाठी गावी जायचे कसे, असा प्रश्‍न चाकरमान्यांना पडत होते; मात्र राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोनानात बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाकरमान्यांसमोरचे विघ्न दूर झाले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भाईंदर या पाच डेपोतून 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या आठ दिवसांच्या कालावधीत 397 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटाबरोबरच गावी गेल्यानंतर करण्यात येणारे विलगीकरण, त्यात बसेस सोडण्याच्या नियोजनासाठी मिळालेला कमी कालावधी आदींमुळे यंदाच्या वर्षी नियोजन करण्यात आलेल्या जादा गाड्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 397 पैकी केवळ 220 बसेसच प्रत्यक्ष कोकणात चाकरमान्यांसाठी धावल्या आहेत. यामध्ये 12 ऑगस्टपर्यंत 216 बसेस सोडण्यात आल्या होत्या; तर 13 ऑगस्ट रोजी अवघ्या चार बसेस कोकणात रवाना झाल्या. त्यामुळे नियोजन करण्यात आलेल्या बसेसपैकी 177 कमी बसेस कोकणात सोडण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी नियंत्रक विभागाकडून देण्यात आली. 

निर्बंधाचा अडथळा 
मागील वर्षी गणेशोत्सवासाठी नियोजित बसेसव्यतिरिक्त 3 हजार 700 जादा बसेस कोकणात सोडण्यात आल्या होत्या. तसेच एका बसमध्ये पूर्वी 40 ते 45 प्रवासी प्रवास करीत होते; मात्र यंदा कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याचे देण्यात आलेली मुभा, 10 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आदी कारणांमुळे एसटी बसेसना प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. 
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT