मुंबई

सावधान ! कोविड रूग्णांना ‘गुलियन बँरी सिंड्रोम’या दुर्मिळ आजाराचा धोका

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये सध्या 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रूग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. परळच्या ग्लोबल रूग्णालयात महिलेवर उपचार झाले आहेत. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने 26 ऑक्टोबर या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

49 वर्षीय माधवी धारिया रायगड जिल्ह्यातील महाड शहरात राहणाऱ्या आहेत. या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या आजाराची सौम्य लक्षणं असल्याने या महिलेवर आणि तिच्या पतीवर घरीच उपचार करण्यात आले. मात्र, तीन आठवडयानंतर तिला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरू होते. पण, काही दिवसांनी चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाला होता. या महिलेला चालताही येत नव्हतं. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी तिला मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात दाखल केलं. 

काय आहे हा आजार ?

गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांच्यासारख्या अवयवांवर परिणाम करतो. कोरोनाच्या काळात जीबीएस प्रकरणांची संख्या वाढत आहे. ग्लोबल रूग्णालयात मागील चार महिन्यात अशी तीन प्रकरणं समोर आलेली आहेत. तर मुंबईतील न्यूरोलॉजिस्टने आतापर्यंत किमान 25 प्रकरणे पाहिली आहेत.

ग्लोबल रूग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, या महिलेच्या चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता, हातांनी काहीही पकडता येत नव्हतं, बोलताना शब्दही स्पष्ट उच्चारता येत नव्हते. अशा स्थितीत या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचं निष्पन्न झालं.

"गुलियन बॅरी सिंड्रोम" (जीबीएस) हा एक दुर्मिळ विकार आहे. मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास संसर्गजन्य आजाराची पटकन लागण होते. मात्र, हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रूग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. जीबीएस हा आजार श्वसन किंवा गॅस्ट्रो इंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, "वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रूग्ण यातून बरा होऊ शकतो. यावर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इंजेक्शनचा कोर्स पाच दिवस दिला जातो. या उपचारानंतर 10 दिवसांनी रूग्ण घरी जाऊ शकतो.

very rare guillain barre syndrome observed post covid 49 years old treated in parel hospital 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT