vidhan sabha 2019 congress ncp manifesto mumbai jayant patil balasaheb thorat 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता; वाचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहीरनामा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षाच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून, राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचे लेखोजोखा महाआघाडीने जाहिरनाम्यात मांडला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षांतील वित्तीय स्थिती खालावली आहे. असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली.

युती सरकारच्या काळात राज्याची अधोगती
आघाडी सरकाच्या काळात आर्थव्यस्थेचा वृध्दीदर 13 टक्के होता तो घसरून 10.4 टक्के झाला आहे. सरकारने 32 हजार रोजगार भरतीची घोषणा केली मात्र त्यासाठी 32 लाख बेरोजगारांनी अर्ज दाखल केले. यावरून राज्यातील बेरोजगारीनं उच्चांक गाठल्याचे जयंत पाटील व बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ 18 टक्के होती. त्यामधे युती सरकारच्या काळात 11 टक्के इतकी घसरण झाली आहे.  आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न 19.5  टक्के इतका होता. तो मागील पाच वर्षात कर वसुली 8.25  टक्के इतका खाली आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शपथनामामधील ठळक घोषणा

  1. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार
  2. तरूण सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार रूपये भत्ता
  3. उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
  4. कामगारांना किमान 21 हजार वेतन
  5. महिला गृह उद्योगाच्या विक्री उत्पादनाला जीएसटी पुर्णपणे माफ करणार
  6. दिव्यांगाना बीपीएल च्या सवलती देणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT