वाह मुंबईकर! गणेशोत्सवातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल 'या' परिषदेकडून कौतुक 
मुंबई

वाह मुंबईकर! गणेशोत्सवातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल 'या' परिषदेकडून कौतुक

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेषत: मुंबईतील गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आरोग्योत्सवावर भर दिला. परिणामी मुंबईत या काळात विक्रमी रक्तदान झाले असून सर्वच संस्था तसेच मंडळांच्या पुढाकारामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले. 

लालबागचा राजा मंडळाने मार्च महिन्यात 1,750 पिशव्या रक्ताचे संकलन केले; तर सिद्धिविनायक न्यासाकडून एप्रिल ते जुलै महिन्यात 1,844 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. लालबागचा राजा मंडळाने आरोग्य उत्सवात 22 ते 31 ऑगस्टदरम्यान पुन्हा 10,272 रक्तपिशव्यांचे विक्रमी रक्त संकलन केले. मुंबईत या दोन्ही मंडळांनींच 13 हजार 866 पिशव्यांचे रक्तसंकलन केले, असे परिषदेकडून सांगण्यात आले. 

मुंबईतील लहान-मोठ्या सार्वजनिक व सामाजिक मंडळांनी रक्तदानासाठी मोठी मदत केली. लालबागचा राजा मंडळ व सिद्धिविनायक न्यासाने, तर नियोजनबद्ध आयोजन करून रक्तसंकलन केले. या सर्व प्रयत्नांमुळे आता रक्तसाठ्याची स्थिती खूप चांगली आहे. 
- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद 

-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १०वा 'हिंद केसरी'? 'या' ८ मल्लांवर अवघ्या राज्याची नजर!, महाराष्ट्राचे ९ हिंद केसरी पैलवान,पाहा संपूर्ण यादी

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल टप्प्याटप्प्याने 25 रुपयांपर्यंत महागण्याचा इशारा; आज किती आहे दर?

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

Sourav Ganguly Interview : मला ‘फेज टू’चा धोनी आवडत नाही, असं का म्हणाला सौरव गांगुली? 'त्या' सामन्याबाबतही केला मोठा खुलासा

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

SCROLL FOR NEXT