corona 
मुंबई

आता उच्चभ्रूंच्या वस्तीत वाढतोय कोरोना; वाचा कोणते वॉर्ड ठरतायत हॉटस्पॉट... 

समीर सुर्वे

मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईत मात्र कोरोनाचे प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे. मुंबईसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी झोपडपट्टीतही कोरोना चांगल्याप्रकारे नियंत्रणात आला आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असलीतरी मुंबईतील काही भागात कोरोना डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

मुंबईतील कुलाबा ए प्रभाग आणि वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम एच पश्चिम प्रभागात  कोव्हिड संक्रमण वाढू लागले आहे. या दोन प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून वाढीच्या दर वाढला आहे. ए प्रभागात 13 जुलै रोजी कोरोनाचे रुग्ण 62 दिवसात दुप्पट होत होते.  17 जुलै पर्यंत हा कालावधी 43 दिवसांपर्यंत आला आहे. तर एच पश्चिम मध्ये हा कालावधी 46 दिवसांवरुन 43 दिवसांवर आला असल्याची माहिती महापालिकेने प्रसिध्द केली आहे. 

मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवसांवर आला तर वाढीचा दर 1.30 टक्क्यांवर पोहचला आहे. वांद्रे, सांताक्रुझ पूर्व एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 153 दिवसाचा आहे. बोरीवली आर मध्य या एकमेव प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 28 दिवसांवर स्थिर आहे.

शहरातील इतर भागांमध्ये कोविड संक्रमणावर नियंत्रण येत आहे. मात्र ए आणि एच पश्चिम प्रभागातील सक्रमणाचा दर वाढला आहे. ए प्रभागात 13 जुलै पर्यंत 2098 रुग्ण आढळले होते. तर, 17 जून रोजी 2246 रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. 13 जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णवाढीत या प्रभागाचा क्रमांक 17 होता तो आता 5 वर आला आहे. एच पश्चिम प्रभागात 13 जुलैपर्यंत  2393 रुग्ण आढळले होते. तर 17 जुलैपर्यंत 2547 रुग्ण आढळले आहेत. या प्रभागाचा क्रमांक 8 वरुन 6 क्रमांकावर घसरला आहे.

मुलुंड, दहिसरमध्ये रुग्णवाढ घटली
मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. फक्त बोरिवली प्रभागातील दर दोन टक्क्या पेक्षा जास्त 2.5 टक्के स्थिर आहे. ए प्रभागातील रुग्ण वाढीचा दर 1.1 टक्क्यावरुन 1.6 टक्क्यांवर, तर एच पश्चिम प्रभागातील दर 1.5 टक्क्यांवरुन 1.6 टक्क्यांवर आला आहे. मुलुंड टी, ग्रॅन्ट रोड, कांदिवली आर दक्षिण आणि आर उत्तर दहिसर या प्रभागातील रुग्णवाढीचा दर पूर्वी दोन टक्क्यांहून अधिक होता. तो आता मुलुंड 2 टक्के, ग्रॅन्टरोड 2 टक्के,कांदिवली 1.9 आणि दहिसर 1.6 टक्क्यांवर आला आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 

प्रभाग 13 जुलै 17 जुलै
आर मध्य 28 28
टि 29 35
डी 34 36
आर दक्षिण 34 37
62 43
एच पश्चिम 46 43


---
(संपादन : ऋषिराज तायडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT