Mantralaya news
Mantralaya news 
मुंबई

Farmers Protest At Mantralaya : मंत्रालयात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या; काय आहे कारण?

Sandip Kapde

Farmers Protest At Mantralaya: अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात पाठवले आहेत. पोलिसांनी १२ ते १५ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

विदर्भातील अमरावती भागातून शेतकरी मंत्रालयात आले आहेत. धरणग्रस्तांच्य प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मोर्शीच्या तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले. 

या आंदोलनातील एका शेतकऱ्याला भोवळ आली असून त्याला उपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला न मिळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य मिळाले नाही.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  1. शासनाकडून घेणे असलेली हक्काच्या मोबदल्याची फरकाची रक्कम व्याजासह देण्यात यावी.

  2. प्रत्येक प्रकल्पग्रस्तास पुनर्वसन कायद्यानुसार देय जमीन लाभक्षेत्रात वा इतरत्र देण्यात यावी.

  3. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास शासकीय निमशासकीय सेवेत समावून घ्यावे. त्याकरीता आरक्षण मर्यादा ५% वरून १५% एवढी करण्यात यावी. हे शक्य नसल्यास प्रमाणपत्र धारकाला २० ते २५ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

  4. जलसंपदा विभागाकडे उप वापरात न येणारी जमीन धरणग्रस्तांना उदनिर्वाह करता कायमस्वरूपी देण्यात यावी.

  5. १०३ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण संदर्भात सरकारने आमच्याशी योग्य चर्चा करावी. अन्यथा याही पेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागविण्याचे काम आम्ही करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (Latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT