apmc 
मुंबई

मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! एपीएमसी मार्केट होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्यामुळे बंद करण्यात आलेले नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट बुधवार (ता. १५) पासून सुरू करण्यात येणार आहे. कांदा-बटाटा व भाजी बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना मार्केट सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मार्केट सुरू करताना त्यांच्या सूचनांप्रमाणे उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन हा सुरूवातीला १४ एप्रिलपर्यंत मर्यादीत होता; मात्र आता सरकारने हा लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात एपीएमसी मार्केट बंद राहिल्यास अन्नधान्यांची टंचाई निर्माण होऊन नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी, माथाडी आणि वाहतूकदार यांनी घोषीत केलेला बंदचा निर्णय मागे घ्यावा, अशी सरकारतर्फे विनंती करण्यात आली. माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा यांनी बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या स्तरावर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अडचणी दूर करण्याबाबत विनंती केली.

बाजार आवारात होणारी ग्राहकांची गर्दी, शेतमाल घेऊन येणारी वाहने, व्यापाऱ्यांकडे कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, माथाडी कामगार आणि बाजारातील इतर घटकांना परवाने देण्यात येणार आहेत. तसेच बाजारात सामाजिक अंतर राहण्याच्या दृष्टीकोनातून कृती आराखडा तयार करावा. या आराखड्यात दररोज मार्केटमध्ये येणाऱ्या शेतमालाच्या वाहनांची आणि ग्राहकांची संख्या निश्चित करावी. याबाबतचे मुद्दे घेऊन विभागिय कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांनी हा आराखडा मंजूर करावा, असा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. 

दोन दिवसात कृती आराखडा तयार
येत्या दोन दिवसांत हा कृती आराखडा तयार करून बाजार पूर्ववत सुरू करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. एपीमएसी मार्केटबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय कूमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बाजार समितीचे प्रशासक अनिल चव्हाण, सहसचिव अविनाश देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : काल सोनं स्वस्त झालं म्हणून खरेदीचा विचार करताय? तर थांबा! आजचा भाव पाहा मग ठरवा...

Malegaon Municipal Election : मालेगावात भाजपची एमआयएमशी छुपी युती; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले....

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

SCROLL FOR NEXT