मुंबई

डेटॉलने हातपाय धुतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात सध्या कोरोना व्हायरसने लोक भयभीत आहेत. चीनमध्ये दिवसागणिक अनेक लोकं कोरोना व्हायरसमुळे आपला प्राण गमावतायत. आतापर्यंत हजारो नागरिकांना कोरोनामुळे आपल्या प्राणांना गमवावं लागलंय. अशात धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा देखील पसरवल्या जातायत. यातील सर्वात भीषण अफवा म्हणजे डेटॉलचे लिक्विड जखमांवर लावल्यास किंवा या लिक्विडने हात साफ केल्यास कोरोनापासून सुटका होऊ शकते हा संदेश. होय सध्या सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय.

या मेसेजसोबत काही फोटो देखील सध्या ट्विटर फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होतायत. या फोटोमध्ये डेटॉलची एक बाटली दिसतेय. डेटॉलच्या बाटलीच्या मागे त्याबद्दलची थोडक्यात माहिती लिहिलेली असते. अशात व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये डेटॉल लिक्विड आणि 'डेटॉल स्प्रे'च्या बाटलीमागे H1N1 त्याचसोबत कोरोना आणि RSV हे विषाणू देखील डेटॉलमुळे मारता येतात असं लिहिल्याचं दिसतंय. डेटॉलमुळे सर्दी खोकल्याच्या विषाणूंपासून आणि इतर आजार पसरवणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे जर डेटॉलमुळे कोरोना सारख्या विषाणूचा खातमा होऊ शकता असेल, तर ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. 

डेटॉलचं स्पष्टीकरण : 

मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या फोटोंमुळे डेटॉल कंपनीने पुढे येत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डेटॉलमुळे कोरोना व्हायरसच्या विषाणूंचा खातमा होऊ शकतो, असं आपण म्हणू शकत नाही असं डेटॉल कंपनीने स्पष्ट केलंय. 

कोरोना लक्षणे :  

भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात अनेकांना सध्या कोरोनाच्या भीतीमुळे देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना सुरवातीला ताप, कफ, श्वासाचा त्रास होतो. नंतर हे आजार तीव्र स्वरूप धारण करतात.  

washing hands with dettol will help you to keep away from corona virus  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT