हिंदमाता परिसर 
मुंबई

मुंबईत पहिल्या ११ दिवसात महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस

फक्त पावसाच्या जोरदार सरींनी हिंदमाता भागात साचलं पाणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत सकाळपासून पाऊस (heavy rain) कोसळतोय. कधी पावसाचा जोर वाढतोय, तर कधी कमी होतोय. बुधवारी मुंबईत झालेल्या पावसाने पालिकेच्या दाव्यांची पोल-खोल केली. अनेक सखल भागात पाणी साचले (Water logging) होते. नेहमीप्रमाण दादर (dadar area) येथील हिंदमाता परिसर, वांद्रे इथल्या मातोश्री सिंगनलवर जिथल्या service road वर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरातही जागोजागी पाणी भरल्याचं दिसून येत आहे. (Water logging at low line areas of mumbai hindmata area)

पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुन्हा बुधवारसारखी स्थिती उदभवू शकते. मागच्या १२ तासात कुलाबा येथे ९० मीमी, सांताक्रूझ येथे १०७ मीमी आणि ठाणे-बेलापूर येथे १०९.२ मीमी पावासाची नोंद झाली आहे.

मुंबई आणि उपनगरात पुढील ४८ तास पावसाच्या सरी अधिक तीव्रतेने बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

मुंबईत रात्रीपासूनच पावसाचा जोर बघायला मिळतोय.सकाळ पासून विजांचा कडकडात आणि ढगांचा गडगडाट ही होतोय. मुंबईसह ठाणे,पालघर आणि रायगड मध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत "ऑरेंज अलर्ट"सह कोकणातल्या काही भागात रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

जूनच्या ११ दिवसात ५६५.२ मीमी पाऊस

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत आतापर्यंत ५६५.२ मीमी पाऊस कोसळला आहे. महिन्याची सरासरी ५०५ मीमी पावसाची आहे. जूनच्या पहिल्या ११ दिवसातच ५६५.२ मीमी पाऊस कोसळला आहे. मुंबईत २०१५ मध्ये महिन्याला सर्वाधिक ११०६.७ मीमी पावसाची नोंद झाली होती. रविवारी राज्याच्या काही भागात २०४.५ मीमी पर्यंत पाऊस कोसळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT