मुंबई

मुंबईसह पाच शहरात पाणीबाणी उद्धभवणार, जागतिक वन्यजीव निधीचा अहवाल

मिलिंद तांबे

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणा-या मुंबई समोर येणा-या दिवसांत पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. भारतातील 30 शहरांना 2050 पर्यंत पाण्याच्या आणीबाणीचा सामना करावा लागणार असल्याचे जागतिक वन्यजीव निधी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.  या शहरांत लोकसंख्येचा विस्फोट होत असून त्या तुलनेत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कमी होणार असल्याचा इशारा यात देण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे गरजेचे असल्याचे ही या अहवालात म्हटले आहे.

WWFच्या अहवालानुसार आर्थिक उलाढालीचे केंद्र असणा-या 100 शहरातं पाण्याची समस्या उद्भवणार आहे. इथे राहणा-या 35 कोटी लोकसंख्येला 2050 पर्यंत पाण्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. हे टाळण्यासाठी तात्काळ कारवाई करणे गरजेचे असून पाण्याचे स्त्रोत वाढवण्याबरोबरच जलवायु परिवर्तनावर प्रभाविपणे काम करणे गरजेचे असल्याचे ही म्हटले आहे. 

WWF ने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रातील पाच शहरांची नावे आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. राज्यातील ही अतिमहत्वाची शहरं आहेत. या शहरांमध्ये राज्यातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरज ही वाढतेय. त्यातुलनेत येथील पाण्याचे स्त्रोत मर्यादित असून पुढे पाण्यासाठी या शहरांना झागडावं लागू शकतं.

देशभरातील इतर मोठ्या आणि महत्वाच्या शहरांची नावे देखील या अहवालात आहेत. दिल्ली, कानपूर, जयपूर, इंदूर, लखनऊ, अमृतसह, श्रीनगर, कोलकाता, बंगळूरू, कोझिकोडा, विशाखापट्टणम, अहमदाबाद, जबलपूर, हुबळी, धारवाड, लुधियाना, जालंधर, धनबाद, भोपाळ, ग्वालियर, सूरत, अलिगड आणि कन्नूर या शहरांचा ही यात समावेश आहे. अहवालाच्या विश्लेषणात या शहरांची 2030 आणि 2050 च्या आधारावर एक ते पाच पर्यंत क्रमांक देऊन वर्गवारी करण्यात आली आहे.

यात तीन पेक्षा अधिक संवेदनशील तर चार पेक्षा अधिक क्रमांक मिळणा-या शहरांचा अतिसंवेदनशील वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. यात भारतातील 30 शहरांना कमीतकमी 3 आणि आणि त्याहून अधिक क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे या शहरातील पाण्याची परिस्थिती फारच गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. लुधियाना, चंदीगढ, अमृतसर आणि अहमदाबाद ही शहरं अतिसंवेदनसील वर्गवारीत आहेत. 

या शहरांना भविष्यात भेडसावणा-या समस्यांप्रती अवगत करणे हा या अहवालाचा मुख्य उद्देश असल्याचे डब्युडब्युएफने म्हटले आहे. यामुळे दिर्घकालीन योजना आखण्यास मदत मिळणार आहे. या अहवालात शहरांची सद्यस्थिती तसेच येणा-या दिवसांमध्ये या शहरांना नेमके कोणत्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे याबाबत अंदाज बांधता येतो. त्यातून पुढे पावसाच्या पाण्याचा योग्य वापर , तलावांचे पुनरूज्जीवन , जलस्त्रोस वाढवण्यासाठी प्रयत्न  यांसह पाणीपूर्तीच्या दिशेने योग्य पावलं उचलण्यास मदत मिळणार असल्याचे ही अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Water shortage in five cities including Mumbai reports World Wildlife Fund

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT